Pradhan Mantri Matru Vandana Yojana: पहिली मुलगी झाली आणि दुसरा चान्स घेतला तर...; केंद्राच्या मातृ वंदना योजनेचा झाला विस्तार
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2022 14:24 IST2022-03-02T14:19:07+5:302022-03-02T14:24:07+5:30
PMMVY for Second Child: या योजनेत पूर्वी पात्र गर्भवती किंवा स्तनदा महिलांचा समावेश करण्यात आला होता. १ एप्रिलपासून विस्तार झालेली योजना लागू होणार आहे.

Pradhan Mantri Matru Vandana Yojana: पहिली मुलगी झाली आणि दुसरा चान्स घेतला तर...; केंद्राच्या मातृ वंदना योजनेचा झाला विस्तार
केंद्र सरकारने प्रधानमंत्री मातृ वंदना योजना (PMMVY) योजनेत बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. याअंतर्गत आता महिलांना दुसरे मूल झाले तरी योजनेचा लाभ मिळणार आहे. मात्र, यासाठी एक अट घालण्यात आली आहे. ही अट पूर्ण झाली तरच याचा लाभ मिळणार आहे.
या योजनेत पूर्वी पात्र गर्भवती किंवा स्तनदा महिलांचा समावेश करण्यात आला होता. १ एप्रिलपासून विस्तार झालेली योजना लागू होणार आहे. मंत्रालयाने या योजनेत तीन गोष्टींचा अतर्भाव केला आहे. यामध्ये मिशन शक्ती, मिशन वात्सल्य, सक्षम अंगणवाडी आणि पोशन २.० यांचा समावेश झाला आहे. टाइम्स ऑफ इंडियाने याबाबतचे वृत्त दिले आहे. ब्यूरो ऑफ पोलिस रिसर्च अँड डेव्हलपमेंट (BRR&D) आणि महिला आणि बाल विकास मंत्रालयाच्या महिला सुरक्षा कार्यक्रमात इंदेवर पांडे यांनी याची माहिती दिली आहे.
या योजनेत गरोदर स्त्रिया आणि स्तनदा माता (PW&LMs) च्या बँक/पोस्ट ऑफिस खात्यावर तीन हप्त्यांमध्ये रोख पैसे पाठविले जातात. संपूर्ण प्रक्रिया सुलभ करण्यात आली आहे आणि रक्कम दोन हप्त्यांमध्ये उपलब्ध होईल. दुसरे अपत्य झाल्यास, संपूर्ण रक्कम लाभार्थीला दिली जाईल. मात्र, यासाठी दुसरीही मुलगीच असली पाहिजे अशी अट आहेय.
मंत्रालयानुसार, केंद्रीय महिला आणि बाल विकास मंत्री श्रीमती स्मृती इराणी यांनी मंगळवारी नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या आठवडाभराच्या उत्सवाचे उद्घाटन केले. 'आझादी का अमृत महोत्सव' या देशव्यापी उत्सवाचा भाग म्हणून महिला आणि बाल विकास मंत्रालय 1 ते 8 मार्च 2022 दरम्यान आंतरराष्ट्रीय महिला दिन सप्ताह साजरा करत आहे.