शहरं
Join us  
Trending Stories
1
“अजित पवार, शेतकऱ्यांनी जीवन संपवावे असे वाटते का तुम्हाला?”; प्रकाश आंबेडकरांचा सवाल
2
"मोदी आणि अमित शाह यांना तर हरवू शकत नाहीत, म्हणून..."; खर्गेंच्या संघावरील बंदीच्या मागणीवर बाबा रामदेव यांची तिखट प्रतिक्रिया
3
रेखा झुनझुनवाला यांची हिस्सेदारी असलेल्या कंपनीला मोठी ऑर्डर; शेअर्स रॉकेट वेगाने धावणार?
4
‘सत्याचा मोर्चा’वरून आयोजकांवर गुन्हा दाखल; मनसेची पहिली प्रतिक्रिया आली, भाजपावर टीका
5
आर्थिक व्यवहारावरून वाद, राष्ट्रवादीच्या नेत्याने रोखली शिंदसेनेच्या नेत्यावर बंदूक
6
Crime: कुटुंबासाठी काळ ठरला नवरा; बायको मुलीसह नातेवाईकाचा विळ्याने चिरला गळा, कारण काय?
7
तुमच्या बचतीवर बक्कळ नफा! ही घ्या ३ वर्षांच्या FD वर सर्वाधिक व्याज देणाऱ्या बँकांची यादी
8
Raj Thackeray : "धर्माच्या नावावर लोकांना आंधळं केलं की..."; राज ठाकरेंची खास पोस्ट, रंगली जोरदार चर्चा
9
पत्नीला द्यायचं होतं सरप्राइज, पानवाल्याने जमवली १ लाखाची नाणी, सोनाराकडे गेला, त्यानंतर...   
10
Video - अडीच वर्षांचा मुलगा खेळताना आली स्कूल व्हॅन अन्...; काळजात चर्र करणारी घटना
11
तुमच्या जुन्या बँक खात्यात पैसे विसरलात का? RBI ने सांगितला फक्त ३ स्टेप्सचा सोपा मार्ग
12
"लोकसंख्या धोरण लवकरात लवकर लागू करणे आवश्यक, तरच..."; RSS ची सरकारकडे मागणी, होसबळे म्हणाले...
13
नात्याला काळीमा ! दीराने वहिनीचे दोन्ही हात पकडून ठेवले अन् पतीने कापला गळा...
14
AUS vs IND 3rd T20I : संजू संघातून ‘आउट’; टॉसवेळी सूर्याचं मिचेल मार्शसमोर भन्नाट सेलिब्रेशन!
15
उद्धव ठाकरेंचा मराठवाड्यात ४ दिवस "दगाबाज रे" संवाद दौरा, शेतकऱ्यांशी साधणार संवाद
16
'ट्रॅजेडी क्वीन' मीना कुमारीवर बायोपिक येणार, क्रिती सेननचा पत्ता कट; 'ही' अभिनेत्री फायनल?
17
भाग्यवान! ११ वर्षांच्या मुलाचं अचानक 'असं' फळफळलं नशीब, रातोरात झाला करोडपती
18
डोक्यात रॉड मारून मोठ्या भावाची हत्या, मग गर्भवती वहिनीवर बलात्कार, नंतर तिलाही संपवलं...
19
अग्नितांडव! मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण आग; लहान मुलांसह २३ जणांचा मृत्यू
20
५,८०० कोटींच्या २००० रुपयांच्या नोटा अजूनही लोकांकडे पडून! अजूनही बदलण्याची संधी

देश नवे विक्रम प्रस्थापित करत होता, तेव्हा काही लोक सेल्फ गोल करत होते; मोदींचा विरोधकांवर जोरदार हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2021 15:52 IST

"एकीकडे आपला देश, आपले तरुण भारताची मान अभिमानाने उंचावत आहेत. एका पाठोपाठ एक विजयी गोल करत आहेत. त्याच वेळी, काही लोक असेही आहेत, जे राजकीय स्वार्थापोटी एक प्रकारे सेल्फ-गोल करत आहेत."

 नवी दिल्ली - 'गरीब कल्याण अन्न योजने'अंतर्गत (Pradhan Mantri garib kalyan anna yojana ) उत्तर प्रदेशातील लाभार्थ्यांशी संवाद साधताना आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विरोधकांवर जोरदार हल्ला चढवला. मोदी म्हणाले, जेव्हा देश नव-नवे विक्रम प्रस्थापित करत होता, तेव्हा काही लोक संसदेचे कामकाज थांबविण्याचा प्रयत्न करत होते. गेल्या काही आठवड्यांत आपण जे विक्रम पाहिले, त्यांत भारतीयांचे सामर्थ्य आणि यश सर्वत्र दिसून येते. संपूर्ण देश उत्साहाने ऑलिम्पिकमधील अभूतपूर्व कामगिरी पाहत आहे आणि संसदेत मात्र, विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे काम ठप्प झाले आहे. (Pradhan Mantri garib kalyan anna yojana pm Narendra Modi lashes out opposition for their conduct in parliament)

काही लोक राजकीय स्वार्थापोटी सेल्फ गोल करत आहेत -विरोधकांवर हल्ला चढवताना पंतप्रधान मोदी म्हणाले, "एकीकडे आपला देश, आपले तरुण भारताची मान अभिमानाने उंचावत आहेत. एका पाठोपाठ एक विजयी गोल करत आहेत. त्याच वेळी, काही लोक असेही आहेत, जे राजकीय स्वार्थापोटी एक प्रकारे सेल्फ-गोल करत आहेत. देश काय साध्य करत आहे, याच्याशी त्यांना काही घेणेदेणे नाही. 

PM मोदी काही दिवसांतच 9 कोटी शेतकऱ्यांना वाटणार 19 हजार कोटी; जाणून घ्या योजना, कुणाला होणार फायदा

हे लोक देशाची भावना दुखावत आहेत -मोदी म्हणाले, "देशाला काय हवे आहे, देश काय साध्य करत आहे, देश कसा बदलत आहे, याच्याशी त्यांना काही एक देणे-घेणे नाही. हे लोक देशाचा वेळा वाया घालत आहेत आणि देशाच्या भावना दुखावत आहेत. हे लोक त्यांच्या राजकीय स्वार्थापोटी भारतीय संसदेचा सातत्याने अपमान करत आहेत.

5 ऑगस्ट एक विशेष तारीख -पंतप्रधान मोदी म्हणाले, "आजची 5 ऑगस्ट ही तारीख अत्यंत विशेष झाली आहे. दोन वर्षांपूर्वी याच तारखेला देशाने एक भारत, श्रेष्ठ भारतच्या भावनेला आणखी बळकटी दिले. 5 ऑगस्टलाच, कलम 370 हटवून, जम्मू-काश्मीरमधील प्रत्येक नागरिकाला प्रत्येक अधिकार आणि प्रत्येक सुविधेचा संपूर्ण लाभ देण्यात आला. एवढेच नाही, तर हीच 5 ऑगस्टची तारीख आहे, ज्या दीवशी कोटी-कोटी भारतीयांनी शेकडो वर्षांनंतर भव्य राम मंदिराच्या दिशेने पहिले पाऊल टाकले. आज अयोध्येत राममंदिराचे काम वेगाने सुरू आहे," असेही मोदी म्हणाले.

बायडेन यांचा पंतप्रधान मोदींना फोन; पाकिस्तान भडकला, अमेरिकेला दिली थेट धमकी!

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाParliamentसंसदOlympics 2020टोकियो ऑलिम्पिक 2021congressकाँग्रेसPoliticsराजकारण