शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

कोर्टाचे अधिकार काढता येणार नाहीत; अवमान हक्कप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने केले स्पष्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2021 06:21 IST

न्यायालयाचे अवमान अधिकार विधिमंडळात कायदे करूनदेखील काढून घेतले जाऊ शकत नाहीत, असे निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी नोंदवले.

ठळक मुद्देन्यायालयाचे अवमान अधिकार विधिमंडळात कायदे करूनदेखील काढून घेतले जाऊ शकत नाहीत, असे निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी नोंदवले.

नवी दिल्ली : न्यायालयाचे अवमान अधिकार विधिमंडळात कायदे करूनदेखील काढून घेतले जाऊ शकत नाहीत, असे निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी नोंदवले. न्यायालयावर दोषारोप करून धमकावल्याबद्दल २५ लाख रुपये जमा न करून अवमान केल्याप्रकरणी स्वयंसेवी संघटनेच्या (एनजीओ) अध्यक्षाला न्यायालयाने दोषी ठरवले. अवमान करणारा न्यायालयाच्या अवमानात स्पष्टपणे दोषी असल्याचे आणि न्यायालयावर दोषारोप करण्याच्या त्याच्या कृत्याला उत्तेजन दिले जाऊ शकत नाही, असे आमचे स्पष्ट मत आहे, असे न्यायालयाने म्हटले.

न्यायमूर्ती एस. के. कौल आणि एम. एम. सुंदरेश यांच्या खंडपीठाने म्हटले की, एनजीओ सुराझ इंडिया ट्रस्टचे अध्यक्ष राजीव दैया हे न्यायालयासह प्रशासकीय कर्मचारी आणि राज्य सरकार अशा प्रत्येकावर चिखल उडवत आले आहेत. अवमानासाठी शिक्षा करण्याचा अधिकार हा या न्यायालयाला घटनात्मक असून तो कायदा करूनदेखील काढून घेतला जाऊ शकत नाही.

न्यायालयाने दैया यांना नोटीस देऊन ७ ऑक्टोबर रोजी सुनावली जाणारी शिक्षा ऐकण्यास हजर राहण्याचा आदेश दिला. न्यायालयावर दोषारोप करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल तुमच्यावर कारवाई का करू नये आणि शिक्षा का देऊ नये, अशी विचारणा करणारी नोटीस सर्वोच्च न्यायालयाने दैया यांना बजावली होती. दैया यांनी खंडपीठाला सांगितले की, सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेला दंड भरण्यास माझ्याकडे उत्पन्नाचे स्रोत नाहीत आणि मी देशाच्या राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज करीन. दैया यांनी अनेक वर्षे ६४ सार्वजनिक हित याचिका दाखल केल्या. त्यांना त्यात यश आले नाही.

२०१७ मध्ये ठोठावला होता २५ लाखांचा दंड सर्वोच्च न्यायालयाच्या अधिकार क्षेत्राचा वारंवार दुरुपयोग केल्याबद्दल २०१७ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने त्यांना २५ लाख रुपये दंड ठोठावला होता. हा निकाल मागे घेण्यात यावा, अशी मागणी करणाऱ्या दैया यांनी दाखल केलेल्या याचिकेवर न्यायालयात सुनावणी सुरू होती.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयIndiaभारतCourtन्यायालय