राहुल गांधी यांच्याकडे सत्ताधा:याचे गुण नाहीत
By Admin | Updated: June 29, 2014 02:23 IST2014-06-29T02:23:22+5:302014-06-29T02:23:22+5:30
उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी लोकसभेत काँग्रेसच्या नेतेपदाची जबाबदारी स्वीकारायला हवी होती.

राहुल गांधी यांच्याकडे सत्ताधा:याचे गुण नाहीत
>नवी दिल्ली : उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी लोकसभेत काँग्रेसच्या नेतेपदाची जबाबदारी स्वीकारायला हवी होती. त्यांच्याकडे शासनकत्र्याचे गुण नाहीत, या शब्दांत काँग्रेसचे सरचिटणीस दिग्विजयसिंग यांनी हल्ला चढवत पक्षाला घरचा आहेर दिला आहे.
‘‘वे सत्ताधारी व्यक्ती नही है, वे ऐसे व्यक्ती है, जो अन्याय के खिलाफ लढना चाहते है’’असे ते गोव्यात एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले. राहुल गांधी यांनी जबाबदारी न स्वीकारता मागच्या बाकावर बसणो पसंत केले आहे. ही जबाबदारी त्यांनी दुस:या नेत्यांकडे सोपविली आहे, असे का? या प्रश्नावर दिग्विजयसिंग यांनी प्रथमच जाहीरपणो टीका करीत नव्या वादाला तोंड फोडले आहे. त्यांनी लोकसभेत पक्षनेतेपद का स्वीकारले नाही, असा प्रश्न खोदून विचारण्यात आला असता ते म्हणाले, लोकशाहीत विरोध हा आवश्यक असतो. काँग्रेस हा सर्वात मोठा विरोधी पक्ष आहे. त्यामुळे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी ही जबाबदारी स्वीकारायला हवी होती. गोव्यात टीका, बेंगळुरुमध्ये खुलासा दिग्विजयसिंग यांच्या विधानानंतर खळबळ उडाली असताना त्यांनी नंतर बेंगळुरुमध्ये खुलासा केला. राहुल गांधी हे नेहमीच अन्यायाविरुद्ध लढत आले आहे. सत्ता मिळविण्यासाठी त्यांचा खटाटोप नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. (लोकमत न्यूज नेटवर्क)
नेतृत्वगुणांवर हल्ला नाही
4तुमचे विधान राहुल गांधी यांच्या नेतृत्व गुणावर हल्ला करणारे नाही काय, असे विचारण्यात आल्यानंतर त्यांनी तसे मुळीच नाही. मला प्रत्येक जण सत्तेच्या मागे लागत नसतो, हे सांगायचे आहे. सोनिया गांधी यांनी पंतप्रधानपद स्वीकारले नाही. हाच त्यांचे कुटुंब व आमच्यातला मतभेदाचा मुद्दा होता. अन्यायाचा मुद्दा असतो तेव्हा राहुल गांधी आक्रमक होतात. ते सध्या पक्षाचे नेतृत्व करीत आहेत, असा खुलासाही त्यांनी केला.