शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
2
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
3
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
4
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
5
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
6
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
7
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
8
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
9
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
10
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
11
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
12
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
13
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
14
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
15
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
16
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
17
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
18
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
19
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
20
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!

राजस्थान सत्तासंघर्षात आता राष्ट्रपतींकडे गाऱ्हाणे

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2020 04:43 IST

अधिवेशनास राज्यपालांचा नकार; पंतप्रधानांनाही सांगितली परिस्थिती

जयपूर : सचिन पायलट व अन्य १८ आमदारांच्या ‘बंडा’मुळे डोक्यावर अस्थिरतेची टांगती तलवार असलेल्या राजस्थानमधील अशोक गेहलोत यांच्या काँग्रेस सरकारची तातडीने विधानसभा अधिवेशन बोलाविण्याची विनंती राज्यपाल कलराज मिश्रा यांनी सोमवारी पुन्हा एकदा नाकारली. त्यानंतर मुख्यमंत्री गेहलोत यांनी ‘लोकनियुक्त सरकारला खच्ची करणाऱ्या’ राज्यपालांविरुद्धचे काँग्रेसचे गाºहाणे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे पत्र लिहून मांडले. गेहलोत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशीही बोलून राज्यातील परिस्थिती त्यांच्या कानावर घातली.

राज्यपालांवर असंवैधानिक दबाब आणण्याच्या निषेधार्र्थ वेळ पडल्यास राष्ट्रपती भवनासमोरही धरणे धरण्याचा आधी जाहीर केलेला मनसुबा बाजूला ठेवून त्याऐवजी काँग्रेसने विविध राज्यांमध्ये राजभवनांवर मोर्चे काढून ‘लोकशाही बचाव’ आंदोलन केले. अनेक ठिकाणी काँग्रेस नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी स्वत:ला अटकही करून घेतली. पक्षांतर करून गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये काँग्रेस विधिमंडळ पक्षत विलिन झालेल्या सहा आमदारांना गेहलोत सरकारच्या विरोधात मतदान करण्याचा ‘व्हिप’ काढून या सत्त्तासंघर्षाला ेवगळी कलाटणी देण्याचा बहुजन पक्षाचा बार फुसका ठरला.

अध्यक्षांनी याचिका मागे घेतलीसंभाव्य अपापत्रता कारवाईविरुद्ध सचिन पायलट व अन्य आमदारांनी केलेल्या याचिकेवर निकाल होईपर्यंत त्यांना बजावलेल्या नोटिसांवर पुढे कारवाई करू नये, या राजस्थान उच्च न्यायालयाने केलेल्या अंतरिम आदेशवजा सूचनेविरुद्ध केलेली विशेष अनुमती याचिका राजस्थान विधानसभेचे अध्यक्ष सी. पी. जोशी यांनी सोमवारी सर्वोच्च न्यायालयात मागे घेतली.

टॅग्स :Rajasthanराजस्थानAshok Gahlotअशोक गहलोत