शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
5
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
6
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
7
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
8
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
9
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
10
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
11
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
12
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
13
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
14
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
15
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
16
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
17
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
18
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
19
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
20
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."

अनेक पक्षांमुळे मतांच्या फाटाफुटीवरच ठरणार पंजाबमधील सत्तेचे गणित

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2019 05:35 IST

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपाने फारशी अपेक्षा न ठेवलेले आणि काँगे्रसला अच्छे दिन दाखवणारे राज्य म्हणून पंजाबकडे पाहिले जाते.

- मनीषा मिठबावकरयंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपाने फारशी अपेक्षा न ठेवलेले आणि काँगे्रसला अच्छे दिन दाखवणारे राज्य म्हणून पंजाबकडे पाहिले जाते. काँग्रेस आणि शिरोमणी अकाली दल या दोन तुल्यबळ पक्षांसोबतच वेगवेगळ्या आघाड्या आणि ‘आप’सह अन्य छोट्या पक्षांनी शड्डू ठोकल्याने मतांची किती फाटाफूट होते, यावरच तेथील निवडणूक निकाल अवलंबून असतील.आम आदमी पक्षाने सर्व १३ जागा लढवणार असल्याचे जाहीर केले आहे. अकाली दलातील बंडखोर नेत्यांचा अकाली दल (टाकसाली) आणि ‘आप’ला सोडचिठ्ठी दिलेल्या नेत्यांची पंजाबी एकता पार्टीही रिंगणात आहे. टाकसालींच्या दलाने बसपा, आपतर्फे निवडून आलेले व आपमध्ये सध्या नसलेल्या खा. डॉ. धरमवीर गांधींच्या गटाशी आघाडी केली आहे. पंजाबी एकता पार्टीलाही या आघाडीत असेल. पंजाब डेमॉक्रेटि अलायन्स असे तिचे नाव आहे.पंजाबने २००९ मध्ये काँग्रेसला कौल दिला. तेव्हा काँग्रेसला आठ, अकाली दलाला चार, तर भाजपाला एक जागा मिळाली. पण २०१४ साली चित्र पालटले. अकाली दलाला चार, भाजपाला दोन, तर काँग्रेसला तीन जागांवर विजय मिळवता आला. या निवडणुकीत पहिल्यांदाच पंजाबच्या राजकारणात आपने प्रवेश करून चार जागा मिळवत प्रस्थापित पक्षांसमोर आव्हान उभे केले.पुढे २०१७ च्या विधानसभा निवडणुकीत आप राज्यात बस्तान बसवेल, असे वाटत होते. मात्र, विधानसभेला जनमताचा लंबक काँग्रेसच्या बाजूने झुकला. काँग्रेसने ११७ पैकी ७७ जागांवर विजय मिळवून एकहाती सत्ता स्थापन केली आणि दहा वर्षांनंतर राज्यात काँग्रेस सत्तेवर आली. कॅप्टन अमरिंदर सिंग दुसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले. भाजपा-अकाली दलाच्या प्रकाशसिंग बादल सरकारचे राज्य खालसा झाले.पंजाबमध्ये नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीतही काँग्रेसने मोठा विजय मिळवला. जिल्हा परिषदेच्या ३५३ पैकी ३३१ जागा जिंकल्या. अकाली दलाला १८ व भाजपाला दोनच जागा मिळाल्या. आपला खातेही उघडता आले नाही. त्यामुळे काँग्रेसची स्थिती मजबूत आहे.लोकसभा निवडणुकीत अकाली दल, भाजपा एकत्र लढतील. भाजपा येथे अकाली दलाच्या लहान भावाच्या भूमिकेत आहे. सध्या अकाली दलाला फुटीचे ग्रहण लागले आहे. खासदार रणजीतसिंग ब्रह्मपुरा, माजी मंत्री रतन सिंग अजनाला, माजी मंत्री सेवासिंग सेखवा यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. त्यांनी प्रकाशसिंग बादल व माजी उपमुख्यमंत्री सुखबीरसिंग बादल या पिता-पुत्रांविरोधात मोर्चा उघडून, शिरोमणी अकाली दल (टकसाली) या पक्षाची स्थापना केली. त्याचवेळी काँग्रेसचे माजी आमदार जोगिंदरसिंग पंजगराई हे समर्थकांसह अकाली दलात सामील झाले आहेत.‘आप’मध्ये ना‘राजीनामा’ नाट्य रंगले आहे. आमदार एच. एस. फुलका यांनी राजीनामा दिला आहे. बंडखोर आमदार सुखपाल सिंग खैरा यांनी पंजाबी एकता पार्टी स्थापन केली आहे. आमदार मास्टर बलदेव सिंग यांनीही खैरा यांच्याशी हातमिळवणी केली आहे, तर टाकसालीने बसपा, डॉ. धरमवीर गांधी यांच्या गटासोबत आघाडी केली आहे. मतांच्या विभाजनासाठी हे राजकीय उद्योग सुरू असल्याने त्याचा फायदा काँग्रेस उठवण्याची शक्यता आहे.मते वळवण्याचे आव्हानमुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस चांगल्या स्थितीत आहे. पण अकाली दलाला बंडखोर नेते रणजित सिंग ब्रह्मपुरा, निलंबित केलेले शेरसिंग घुबाया यांना सशक्त पर्याय शोधावा लागेल. घुबाया यांचा शीख समाजावर मोठा प्रभाव आहे. हा प्रभाव तसेच अकाली दल (टाकसाली) या नव्या पक्षामुळे विभागली जाणारी मते आपल्याकडे वळवणे हेच अकाली दलापुढे आव्हान आहे.असे आहेतप्रचाराचे प्रमुख मुद्देधार्मिक ग्रंथ अवमान प्रकरण, पाणी प्रश्न, अमली पदार्थांचे वाढते जाळे, विकास, शेतकºयांचे प्रश्न, शिक्षण, रोजगार इत्यादी.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Politicsराजकारण