सत्तेचे वारे---अखेरचा भाग
By Admin | Updated: February 14, 2015 23:50 IST2015-02-14T23:50:23+5:302015-02-14T23:50:23+5:30
सदस्य नोंदणी मोहीम राबवून मगो पक्ष विविध भागांत स्वत:ला नेऊ पाहत आहे. अनेक माजी मंत्री व माजी आमदारांना हा पक्ष २०१७ साली तिकीट देऊ पाहत आहे. त्यातून काय निष्पन्न होईल हे आताच सांगता येत नाही पण युती न करता मगोने जिल्हा पंचायत निवडणुका लढवीणे हे मगोच्या देखील हिताचे आहे. म.गो. पक्षाने आता भाजपला जिल्हा पंचायतींसाठी युतीचा प्रस्ताव दिला आहे. भाजपकडून निश्चितच तो प्रस्ताव फेटाळला जाईल. म.गो.शी जिल्हा पंचायतीसाठी युती करायचीच नाही असे भाजपमध्ये जवळजवळ निश्चित झाले आहे. फक्त तशी घोषणा तेवढी बाकी आहे. मगो पक्षाने युती केली तर भाजप केवळ आठ-नऊ जागा त्या पक्षाला सोडेल. यातून म.गो.ला स्वत:ची ताकद कळून येणार नाही. २०१७ सालची निवडणूक म.गो. पक्ष खरोखर गंभीरपणे लढवू पाहत असेल तर आताच स्वत: चे बळ किती व कुठच्या भागात ते किती प्रम्

सत्तेचे वारे---अखेरचा भाग
स स्य नोंदणी मोहीम राबवून मगो पक्ष विविध भागांत स्वत:ला नेऊ पाहत आहे. अनेक माजी मंत्री व माजी आमदारांना हा पक्ष २०१७ साली तिकीट देऊ पाहत आहे. त्यातून काय निष्पन्न होईल हे आताच सांगता येत नाही पण युती न करता मगोने जिल्हा पंचायत निवडणुका लढवीणे हे मगोच्या देखील हिताचे आहे. म.गो. पक्षाने आता भाजपला जिल्हा पंचायतींसाठी युतीचा प्रस्ताव दिला आहे. भाजपकडून निश्चितच तो प्रस्ताव फेटाळला जाईल. म.गो.शी जिल्हा पंचायतीसाठी युती करायचीच नाही असे भाजपमध्ये जवळजवळ निश्चित झाले आहे. फक्त तशी घोषणा तेवढी बाकी आहे. मगो पक्षाने युती केली तर भाजप केवळ आठ-नऊ जागा त्या पक्षाला सोडेल. यातून म.गो.ला स्वत:ची ताकद कळून येणार नाही. २०१७ सालची निवडणूक म.गो. पक्ष खरोखर गंभीरपणे लढवू पाहत असेल तर आताच स्वत: चे बळ किती व कुठच्या भागात ते किती प्रमाणात वाढवायला हवे हे म.गो. पक्षाने जाणून घेणे गरजेचे आहे. त्यासाठी जिल्हा पंचायत निवडणूक ही आपल्यासाठीही सेमी फायनलच आहे असे त्या पक्षाने समजून घ्यायला हवे.काँग्रेस पक्षाची जिल्हा पंचायत निवडणुकीवेळी तयारी नसेल. त्याचा लाभ जसा भाजपला मिळेल तसाच तो म.गो. पक्षालाही मिळणार आहे. उमेदवार निवडीबाबत काँग्रेसकडून घोळ घातला जाईल. बरीच बंडखोरीही होईल. राज्यात भाजपजवळ सध्या सत्ता आहे. त्यामुळे तिथे जास्त बंडखोरी होणार नाही. दिल्लीतील विधानसभा निवडणुकीचा निकाल भाजपच्या विरोधात लागल्याने देशभरातील सर्वच भाजपविरोधी घटकांचे बळ वाढले आहे. मात्र याचा परिणाम गोव्यातील जिल्हा पंचायत निवडणूक निकालावर होईल असे म्हणता येणार नाही. जिल्हा पंचायत निवडणूक निकाल हा पार्सेकर सरकारच्या कारभारासाठी पावती आहे असाही निष्कर्ष काढता येणार नाही. तथापि, भाजपसाठी निकाल पूर्णपणे अनुकूल लागला तर तो सरकारचाही विजय आहे असे तो पक्ष मानील. त्याला उपाय नाही.- सद्गुरू पाटील