शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

डोक्याला १५ फ्रॅक्चर, यकृताचे ४ तुकडे, मान तुटली, हृदय फुटले... मुकेश चंद्राकर यांच्या शवविच्छेदन अहवालातून खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2025 15:41 IST

छत्तीसगडचे पत्रकार मुकेश चंद्राकर यांचा शवविच्छेदन अहवाल समोर आला आहे.

Mukesh Chandrakar Murder Case:छत्तीसगडमधील पत्रकार मुकेश चंद्राकर हत्या प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या खून प्रकरणातील मुख्य आरोपी सुरेश चंद्राकर याला एसआयटीच्या पथकाने हैदराबाद येथून अटक केली आहे. दुसरीकडे, हत्या झालेल्या मुकेश चंद्राकर यांचा शवविच्छेदन अहवाल देखील समोर आला आहे. या अहवालात त्यांच्यावर मृत्यूआधी करण्यात आलेल्या क्रूर अत्याचाराचे पुरावे समोर आले आहेत. शवविच्छेदनानंतर या हत्येत दोनहून अधिक जणांचा सहभाग असण्याची शक्यता डॉक्टरांनी व्यक्त केली आहे.

छत्तीसगडमधील विजापूर येथील रहिवासी मुकेश चंद्राकर हे १ जानेवारीच्या रात्रीपासून बेपत्ता होते. यानंतर दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या मुकेश यांचा मृतदेह सेप्टिक टँकमधून बाहेर काढण्यात आला. मुकेश चंद्राकर यांनी कंत्राटदार सुरेश चंद्राकर यांच्याविरोधात रस्तेबांधणीतील भ्रष्टाचाराचा आरोप केला होता. त्यामुळे मुकेश यांचा खून झाल्याचा संशय व्यक्त होत आहे. त्यांचे शेवटचे ठिकाणही कंत्राटदाराने बांधलेले कंपाउंड होते. त्या कंपाऊडमधील सेप्टिक टँकमध्ये मुकेश यांचा मृतदेह हत्या करुन फेकण्यात आला होता.

शवविच्छेदनानुसार, मुकेशच्या यकृताचे चार तुकडे झाल्याचे समोर आलं आहे. त्यांच्या डोक्यात १५ फ्रॅक्चर आढळून असून त्यांचे हृदय फाटले आहे. तर मान मोडली असून पाच बरगड्या तुटल्या आहेत. तसेच शरीरावर गंभीर जखमांच्या खुणा आहेत. मुकेश चंद्राकार यांचे शवविच्छेदन करणाऱ्या डॉक्टरांचे म्हणणे आहे की, त्यांनी त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीत अशी घटना कधीच पाहिलेली नाही.

मुकेश यांचे शेवटेचे लोकेशन कंत्राटदार सुरेश चंद्राकार यांच्या कंपाउंडजवळ आढळले होते. त्यामुळे झडतीदरम्यान कंपाऊंडमध्ये काँक्रीट टाकल्याचे पोलिसांना आढळून आले. त्यामुळे पोलिसांना संशय आला. पोलिसांनी त्या सेप्टिक टँकचे प्लास्टर काढण्यास सुरुवात केली. त्यात मुकेशचा मृतदेह आढळून आला.

मुकेशचा भाऊ युकेश याने सांगितले की, तो १ जानेवारीला संध्याकाळी घरातून बाहेर पडला होता. काही वेळाने त्याचा फोन बंद होऊ लागला. २ जानेवारीच्या संध्याकाळी त्याचा फोन बंद झाल्यानंतर तो बेपत्ता असल्याची भीती व्यक्त केली जात होती. यानंतर युकेशने २ जानेवारीलाच पोलिस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. २४ डिसेंबर २०२४ रोजी मुकेश यांनी एका राष्ट्रीय वाहिनीसाठी एक रिपोर्ट तयार केला होता. या अहवालात आरोपी कंत्राटदाराविरुद्ध भ्रष्टाचार झाल्याची चर्चा होती. विजापूरमधील गांगलूर ते नेलशनार या रस्त्याच्या कामात भ्रष्टाचाराचे आरोप मुकेश यांनी केले होते. 

टॅग्स :Chhattisgarhछत्तीसगडCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस