शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

दिल्लीत झळकले पंतप्रधान नरेंद्र मोदींविरुद्ध पोस्टर; पोलिसांनी १०० जणांना केली अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2021 08:31 IST

विशेष शाखेने दिल्ली पोलीस आयुक्त एस. एन. श्रीवास्तव यांना भित्तीपत्रकाबद्दल कळवल्यानंतर १२ मे रोजी दिल्लीत लोकांना अटक करण्यात आली.

नवी दिल्ली : कोरोना लसीकरण मोहिमेवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करणारी भित्तीपत्रके चिकटवल्याच्या आरोपावरून दिल्ली पोलिसांनी शंभर जणांना अटक केली. त्यात ई-रिक्षाचालक (३०), शाळा सोडलेला तरुण (१९), लाकडी चौकटी बनवणाऱ्याचा (६१) समावेश आहे. 

विशेष शाखेने दिल्ली पोलीस आयुक्त एस. एन. श्रीवास्तव यांना भित्तीपत्रकाबद्दल कळवल्यानंतर १२ मे रोजी दिल्लीत लोकांना अटक करण्यात आली. पोस्टर्सवर असा मजकूर लिहिला होता : “मोदी जी हमारे बच्चों की व्हॅक्सिन विदेश क्यों भेज दिया?” पोलिसांनी ज्यांंना अटक केली ते एक तर रोजंदारीवरील मजूर आहेत किंवा बेरोजगार युवक. हे मजूर आणि बेरोजगार युवकांनी ही भित्तीपत्रके चिकटवली, फलक लावले. ही भित्तीपत्रके किंवा फलकांवरील मजकुराबद्दल किंवा त्यात गुंतलेल्या राजकारणाची त्यांना काहीही कल्पना नव्हती.

आरोपी काय म्हणाला?अटक झालेला राहुल त्यागी म्हणाला की, “आम आदमी पक्षाचे नगरसेवक धीरेंद्र कुमार यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्याने मला २० फलक ११ मे रोजी दिले व कल्याणपुरीत ते लावण्यासाठी ६०० रुपये देण्याचे आश्वासन दिले.” धीरेंद्र कुमार यांनी हा आरोप नाकारला व मी फक्त लोकांची कामे करतो, असे म्हटले. ‘आप’ने या आरोपाला उत्तर दिले नाही. परंतु, ट्विटरवर म्हटले की, “मोदी जी हमारे बच्चों की व्हॅक्सिन विदेश क्यों भेज दिया?”

राहुल गांधी यांनी दिले आव्हान; मलाही अटक करा

काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि सरचिटणीस प्रियांका गांधी यांनीदेखील तेच पोस्टर शेअर केले आहे. राहुल गांधी यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, मलादेखील अटक करा. यासोबत राहुल गांधी यांनी त्या पोस्टरचा फोटोदेखील शेअर केला आहे आणि विचारले आहे की, मोदीजी, आपण आमच्या मुलांच्या लसी विदेशात का पाठविल्या. त्यांनी हेच पोस्टर आता प्रोफाईल फोटो म्हणून ठेवले आहे. 

सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी म्हटले आहे की, पोस्टरच्या माध्यमातून विरोध करणे गुन्हा असेल तर आम्ही हा गुन्हा पुन्हा पुन्हा करु.  प्रियांका गांधी यांनीदेखील हेच पोस्टर प्रोफाईल फोटो म्हणून ठेवले आहे. काँग्रेसचे प्रवक्ते पवन खेडा यांनीही या मुद्द्यावरून  मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. पक्षाचे संसद सदस्य आणि माजी केंद्रीय मंत्री जयराम रमेश यांनी आपल्या घराबाहेर एक पोस्टर लावत विचारले की, लसीप्रमाणेच पंतप्रधान कोठे गायब आहेत. राजद, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, तृणमूल काँग्रेस, डीएमके यांच्यासह अनेक राजकीय पक्ष ही मोहीम वेगवान करत आहेत. जेणेकरून लसीसाठी केंद्र सरकारवर दबाव येईल. 

 

 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाRahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेस