रजनीकांत व भाजपा एकत्र येण्याची शक्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2018 04:14 IST2018-05-11T01:40:06+5:302018-05-11T04:14:27+5:30
भारतीय जनता पार्टीने आता दक्षिणेत पाय रोवण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. त्यासाठी नवे मित्र शोधणाऱ्या भाजपाची तामिळनाडूमध्ये सारी भिस्त अभिनेता रजनीकांतवर आहे. येत्या काळात रजनीकांतची भाजपाशी युती होऊ शकते, असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेच म्हटले आहे. रजनीकांत यांनी भाजपाबाबतची आपली भूमिका अद्याप स्पष्ट केलेली नाही.

रजनीकांत व भाजपा एकत्र येण्याची शक्यता
नवी दिल्ली - भारतीय जनता पार्टीने आता दक्षिणेत पाय रोवण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. त्यासाठी नवे मित्र शोधणाऱ्या भाजपाची तामिळनाडूमध्ये सारी भिस्त अभिनेता रजनीकांतवर आहे. येत्या काळात रजनीकांतची भाजपाशी युती होऊ शकते, असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेच म्हटले आहे. रजनीकांत यांनी भाजपाबाबतची आपली भूमिका अद्याप स्पष्ट केलेली नाही.
संघाचे वैचारिक गुरू एस. गुरुमूर्ती यांनी म्हटले की, रजनीकांत व पंतप्रधान मोदी ही जोडी तामिळनाडूमध्ये एकत्र येऊ न सरकार बनवू शकेल. तामिळनाडूच्या राजकारणात रजनीकांत लवकरच पाय रोवू शकतील. त्यांची जादू व मोदी यांचे प्रशासकीय कौशल्य या बळावर दोघे तामिळनाडूमध्ये स्थिर सरकार स्थापन करू शकतील.