‘उज्ज्वला’ सिलिंडरचे अनुदान वाढण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2019 04:11 AM2019-04-19T04:11:32+5:302019-04-19T04:11:56+5:30

उज्ज्वला कल्याणकारी योजनेत दिल्या जाणाऱ्या स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरवर वाढीव अनुदान देण्याचा विचार केंद्र सरकार करू शकेल.

The possibility of increasing the 'bright' cylinder subsidy | ‘उज्ज्वला’ सिलिंडरचे अनुदान वाढण्याची शक्यता

‘उज्ज्वला’ सिलिंडरचे अनुदान वाढण्याची शक्यता

नवी दिल्ली : उज्ज्वला कल्याणकारी योजनेत दिल्या जाणाऱ्या स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरवर वाढीव अनुदान देण्याचा विचार केंद्र सरकार करू शकेल. या योजनेतून गरीब कुटुंबांना स्वयंपाकाच्या गॅसची जोडणी विनामूल्य दिली जाते.
अनेक राज्यांतून मिळालेल्या माहितीनुसार तेथे गॅस सिलिंडरचा भाव हा इष्टतम किमतीच्या खाली आहे. त्यामुळे केंद्र सरकारसमोर अनुदान वाढविण्याचा एक पर्याय आहे, असे नाव न सांगण्याच्या अटीवर वरिष्ठ सरकारी अधिकाºयाने सांगितले. याविषयीचा अंतिम निर्णय केंद्रात नवे सरकार आल्यानंतर घेतला जाईल. सध्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू आहे. १९ मे रोजी शेवटच्या टप्प्यातील मतदान आहे.
>गरिबांना फायदा
केंद्र सरकारने प्रधानमंत्री उज्ज्वला योजना मे २०१६ मध्ये सुरू केल्यापासून ७१.९ दशलक्ष गॅस जोडण्या देशभर ७१४ जिल्ह्यांत दिल्या आहेत. देशात स्वयंपाकासाठी कोळसा, सरपण, गोवऱ्यांचा वापर गरीब कुटुंबांत अनेक वर्षांपासून केला जातो. त्यामुळे महिला आणि लहान मुलांचे आरोग्य सुरक्षित राहण्यासाठी सरकारने स्वच्छ इंधन म्हणून हा गॅसचा पर्याय या योजनेतून दिला आहे. सिलिंडरवर वाढीव अनुदान दिल्यास ते आणखी स्वस्त होईल व गरीब कुटुंबांना ते परवडू शकेल.

Web Title: The possibility of increasing the 'bright' cylinder subsidy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.