शहरं
Join us  
Trending Stories
1
भयानक!! इस्रायलचा सीरियाच्या संरक्षण मंत्रालयावर मोठा हल्ला; संपूर्ण इमारतीच्या चिंधड्या, पाहा VIDEO
2
नीलम गोऱ्हेंचा आग्रह अन् ठाकरेंचा नकार; उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकाच फ्रेममध्ये, फक्त खुर्चीचे होतं अंतर
3
CM देवेंद्र फडणवीसांच्या ऑफरवर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले...
4
“वयाच्या १० वर्षापासून RSSशी संबंध, मी पुन्हा येईन, पण कुठून येईन ते विचारू नका”: दानवे
5
अनैतिक संबंधांसाठी पत्नीनं सोडली मर्यादा, केला गंभीर गुन्हा, तिला कठोर शिक्षा द्या म्हणत पती झाला भावूक 
6
जयंत पवार पायउतार होताच रोहित पवारांकडे मोठी जबाबदारी; सुप्रिया सुळेंनी केली महत्त्वाची घोषणा
7
इन्स्टावर ओळख, १४००० किमीचा प्रवास करून मुलगी भारतात, पाठोपाठ घरचेही आले अन् सर्वांना बसला धक्का
8
"उद्धवजी, तुम्हाला इकडे यायचा स्कोप, विचार करता येईल"; विधान परिषदेत देवेंद्र फडणवीसांकडून ऑफर
9
शरिया कायद्यातील 'ब्लड मनी' काय आहे? निमिषा प्रियाचा जीव वाचवण्याचा शेवटचा मार्ग
10
BHEL: दहावी पास उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची संधी, बीएचईएलमध्ये भरती सुरू, 'अशी' होणार निवड!
11
हृदयस्पर्शी! १४ वर्षांनी लेकाने पूर्ण केलं वडिलांचं स्वप्न, गिफ्ट केली बुलेट, Video पाहून पाणावले डोळे
12
१४ गावांचा प्रश्न मिटणार, तेलंगणातून महाराष्ट्रात येणार; CM देवेंद्र फडणवीसांनी दिले निर्देश
13
विभान भवनाच्या आवारात गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाडांमध्ये तुफान राडा, शिविगाळ
14
स्टार प्रवाहनंतर तेजश्री प्रधानचा 'झी मराठी'कडे यू-टर्न, यावर सतीश राजवाडे म्हणाले....
15
मालमत्तेवरून वाद विकोपाला, धाकट्या भावाने थोरल्या भावाच्या कुटुंबाच्या अंगावर घातली गाडी, घटना CCTV कॅमेऱ्यात कैद
16
निमिषा प्रिया प्रकरण : फाशी टळली, पण दिलासा नाहीच! अता तलालचा भाऊ म्हणाला, "खून खरीद नहीं सकते, अल्लाह...!"
17
१० वर्षांच्या मुलाने चालवला ट्रक, लोकांचा जीव धोक्यात; Video पाहून चुकेल काळजाचा ठोका
18
“भाजपात संघटन चांगले, शिंदेसेनेत पक्षांतर्गत शिस्त नाही, त्यामुळे...”; हेमंत गोडसे थेट बोलले
19
"मुलींपासून दूर केलं, मला न सांगता..."; गुहेत सापडलेल्या रशियन महिलेच्या पतीने मांडली व्यथा
20
२४० km रेंज अन् स्टायलिश लूक; लॉन्च झाली दमदार EV क्रूझर बाईक, किंमत फक्त सव्वा लाख...

देशात पुन्हा आणीबाणीची शक्यता

By admin | Updated: June 19, 2015 03:28 IST

लोकशाही व्यवस्था चिरडू शकणाऱ्या शक्तींचे बळ वाढले असून देशात पुन्हा आणीबाणीची शक्यता नाकारता येत नाही, अशी भीती भारतीय जनता पक्षाचे (भाजप) ज्येष्ठ नेते

नवी दिल्ली : लोकशाही व्यवस्था चिरडू शकणाऱ्या शक्तींचे बळ वाढले असून देशात पुन्हा आणीबाणीची शक्यता नाकारता येत नाही, अशी भीती भारतीय जनता पक्षाचे (भाजप) ज्येष्ठ नेते आणि मार्गदर्शक लालकृष्ण अडवाणी यांनी व्यक्त केली आहे. केंद्रात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकार सत्तारूढ असताना अडवाणी यांनी केलेल्या या खळबळजनक वक्तव्याने राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना ऊत आला आहे. मोदींवर लक्ष्य साधण्यासाठीच अडवाणी यांनी हे विधान केले असल्याची चर्चा असली तरी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने (आरएसएस) मात्र हा तर्क फेटाळला आहे. दुसरीकडे काँग्रेससह इतर विरोधी पक्षांनी अडवाणी यांच्या या मताला आपली सहमती दर्शविली आहे. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी आणीबाणी लागू केल्याच्या घटनेला येत्या २५ जून रोजी ४० वर्षे पूर्ण होत आहेत. त्याअनुषंगाने अडवाणी यांनी मुलाखतीत आणीबाणीबाबतची भीती अधोरेखित केली आहे. काय म्हणाले अडवाणी-सद्य:स्थितीत संवैधानिक आणि कायद्याचे संरक्षण असतानाही लोकशाही चिरडण्याची क्षमता असलेल्या शक्तींचे बळ वाढले आहे. १९७५ ते ७७ या आणीबाणीच्या काळानंतर नागरिकांच्या स्वातंत्र्यावर पुन्हा गदा येऊ नये याची शाश्वती देणारे कुठलेही पाऊल उचलण्यात आलेले नाही. त्यामुळे भविष्यात आणीबाणीची परिस्थिती निर्माण होणार नाही असे मी खात्रीने सांगू शकत नाही, असे परखड मत देशाचे उपपंतप्रधान राहिलेले लालकृष्ण अडवाणी यांनी मांडले आहे. -आपल्या राजकीय नेतृत्वात लोकशाहीबद्दलची निष्ठा आणि कटिबद्धता जाणवत नाही, अशी खंत व्यक्त करताना अडवाणी म्हणाले की, देशात पुन्हा आणीबाणी अथवा व्यक्तिस्वातंत्र्यावर गदा येणारी परिस्थिती निर्माण होणार नाही याबाबत आश्वस्त करणारी कुठलीही लक्षणे आपल्या राजकीय व्यवस्थेत दिसत नाहीत. याचा अर्थ आपले राजकीय नेतृत्व परिपक्व नाही असे मला म्हणायचे नाही; परंतु त्यातील उणिवांमुळे माझा त्यांच्यावर विश्वास राहिलेला नाही. आणीबाणीची परिस्थिती पुन्हा येणार नाही याची खात्री वाटत नाही. अडवाणींच्या वक्तव्यावर प्रतिक्रियांचा पाऊस-अडवाणी यांच्या आणीबाणीसंदर्भातील वक्तव्यावर प्रतिक्रियांचा पाऊस पडला असून विविध विरोधी पक्षांनी त्यांच्या या मताशी सहमती दर्शविली आहे. अडवाणींनी अप्रत्यक्षपणे मोदींना लक्ष्य केले असल्याचा विरोधकांचा तर्क आहे; परंतु राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने मात्र याचा इन्कार केला आहे.-लालकृष्ण अडवाणी हे ज्येष्ठ आणि अनुभवी आहेत. भाजपच्या मार्गदर्शक मंडळातही त्यांचा समावेश आहे. त्यामुळे गरज वाटल्यास ते मोदींशी थेट बोलू शकतात. तेव्हा या मुलाखतीच्या माध्यमाने मोदींना काही संदेश देण्याचा त्यांचा विचार असावा असे वाटत नाही.मा.गो. वैद्य, आरएसएसचे विचारवंत- अडवाणी व्यक्तींचा नव्हे, तर संस्थांचा उल्लेख करीत होते, असे मला वाटते. त्यांच्या मतांचा मी आदर करतो; परंतु व्यक्तिश: मला देशात पुन्हा आणीबाणी लागू होण्याची शक्यता अजिबात वाटत नाही. तो काळ गेला. आता भारतीय लोकशाही फार बळकट झाली आहे. -एम.जे. अकबर, प्रवक्ता,भाजप-भाजपतूनच ज्युरी समोर आली आहे. अडवाणी कुणाबाबत बोलताहेत हे अगदी स्पष्ट आहे. त्यांना भाजपत राजनेत्याचा दर्जा असल्याने ते पंतप्रधानांचा नामोल्लेख करू इच्छित नाहीत; परंतु त्यांचा संकेत मोदींकडेच होता हे मुलाखत वाचल्यानंतर स्पष्ट होते. टॉम वड्डकन, प्रवक्ता, काँग्रेस-लालकृष्ण अडवाणी हे भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांना वाटणाऱ्या चिंतेचा गांभीर्याने विचार झाला पाहिजे. आणीबाणीच्या परिस्थितीचा जेथवर प्रश्न आहे, तर आम्ही दररोज अशा स्थितीचा सामना करीत आहोत.-नितीशकुमार, मुख्यमंत्री,बिहार-अडवाणी खरे तेच बोलले. आणीबाणीची शक्यता फेटाळता येणार नाही. याचा पहिला वापर दिल्लीत होणार काय?अरविंद केजरीवाल, मुख्यमंत्री, दिल्ली