दिल्लीतील मेट्रो स्टेशनच्या टीव्हीवर दाखवला पॉर्न व्हिडीओ

By Admin | Updated: April 15, 2017 18:42 IST2017-04-15T18:37:48+5:302017-04-15T18:42:46+5:30

राजधानी नवी दिल्लीतील राजीव चौक मेट्रो स्टेशनवर असलेल्या एलईडी टीव्हीवर अचानक पॉर्न व्हिडीओ दाखवण्यात आला.

Porn videos shown on TV stations in Delhi Metro station | दिल्लीतील मेट्रो स्टेशनच्या टीव्हीवर दाखवला पॉर्न व्हिडीओ

दिल्लीतील मेट्रो स्टेशनच्या टीव्हीवर दाखवला पॉर्न व्हिडीओ

>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 15 - राजधानी नवी दिल्लीतील राजीव चौक मेट्रो स्टेशनवर असलेल्या एलईडी टीव्हीवर अचानक पॉर्न व्हिडीओ दाखवण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेची चौकशी करण्यासाठी दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशननं (DMRC) एक समिती स्थापन केली आहे. ही समिती या घटनेची सध्या चौकशी करत आहे. 
 
ही घटना 9 एप्रिल रोजी घडल्याची माहिती समोर आली आहे. यानंतर हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.  DMRC नं सांगितले की, ज्या टीव्हीवर हा पॉर्न व्हिडीओ चालवण्यात आला त्या टीव्हीवर जाहिरातींशिवाय दुसरे काहीही दाखवले जात नाही. दरम्यान, ज्या दिवशी हा प्रकार घडला त्यावेळी कोणतीही तक्रार न आल्यानं घडल्या प्रकारबाबत कोणतीच माहिती न मिळल्याचं मेट्रो रेल्वे प्रशासनानं सांगितले.  
 
9 एप्रिल रोजी राजीव चौक मेट्रो स्टेशनवरील एका टीव्हीवर अचानक पॉर्न व्हिडीओ सुरू झाला होता. यावेळी आसपास असलेले प्रवाशांनी त्याचे चित्रिकरण केले व संबंधित व्हिडीओ व्हायरल केला.   
 
दरम्यान,  नवी दिल्लीतील वर्दळीचं मेट्रो स्टेशन म्हणून राजीव चौक स्टेशनची ओळख. येथे 24 तास लोकांची ये-जा सुरू असते. अशा स्टेशनवर पॉर्न व्हिडीओ दाखवलं जाणं ही लज्जास्पद बाब असल्याची टीका केली जात आहे.
  

Web Title: Porn videos shown on TV stations in Delhi Metro station