शिमला - भाजपाच्या दोन नेतांच्या व्हिडीओ व्हायरल झाल्याने सध्या हिमाचल प्रदेशमधील राजकारणात खळबळ उडाली आहे. या व्हिडीओमध्ये भाजपाची एक महिला नेता आणि एक पुरुष नेता दिसत आहे. दरम्यान, हा व्हिडीओ व्हायरल होऊ लागल्यानंतर पक्षाने या दोघांवरही कारवाई करत त्यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. या व्हिडीओत दिसत असलेली महिला नेता भाजपाच्या महिला मोर्चाची पदाधिकारी आहे. तर व्हिडीओत दिसत असलेला पुरुष हा भारतीय जनता युवा मोर्चाचा पदाधिकारी आहे. दरम्यान, या प्रकाराबाबत हिमाचल प्रदेशमधील भाजपा आमदार सुरेंद्र शौरी यांनी हिंदी संकेतस्थळ नवभारत टाइम्सकडे प्रतिक्रिया देताताना सांगितले की, ''या दोन्ही नेत्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. अशा लोकांना पक्षात स्थान असता कामा नये. तसेच त्यांना यापुढेही पक्षात स्थान मिळणार नाही. अशाप्रकारची अश्लीतता पक्षसंघटनेमध्ये खपवून घेतली जाणार नाही.''
भाजपाच्या नेत्यांचा अश्लील व्हिडीओ व्हायरल, पक्षाने घेतली अशी भूमिका
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2019 12:42 IST