शहरं
Join us  
Trending Stories
1
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
2
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
3
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
4
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
5
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
6
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
7
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
8
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
9
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
10
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
11
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
12
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं
13
पुतीन यांची दहशत...! 27 देशांनी घेतला रशियाचा धसका; जगात पहिल्यांदाच तयार होणार 'ड्रोन वॉल', कसं काम करणार?
14
'देशद्रोह्यांनी मॅच एन्जॉय केली असेल', IND-PAK सामन्यावरुन उद्धव ठाकरेंची बोचरी टीका
15
Upcoming Smartphones: वनप्लस १५, विवो एक्स ३०० आणि बरंच काही; ऑक्टोबरमध्ये लॉन्च होत आहेत 'हे' ६ फोन!
16
"गुरूजी म्हणाले, 'दाताखाली जीभ आली म्हणून आपण दात पाडत नाही"; मोदींनी सांगितली आठवण
17
ST Bus Fare Update: दिवाळासाठी एसटीने केलेली १० टक्के भाडेवाढ रद्द; पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदेंनी केली घोषणा
18
Dussehra 2025: दसऱ्याला रावण दहनानंतरची राख, घरी का आणतात माहितीय? काय आहे परंपरा?
19
DA Hike: दिवाळीपूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज, महागाई भत्त्यात 3% वाढ; आता 'एवढा' पगार मिळणार
20
खोलीत पेटती लाईट, आत मृतदेह, अन् बाहेरून कुलूप, अशी पकडली गेली १६ वर्षांची आरोपी मुलगी   

लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2025 18:37 IST

'विविधतेत एकता’ ही भारताची आत्मा आहे. मात्र, जात, भाषा, प्रादेशिकता आणि अतिवादी विचारांनी प्रेरित विभाजनाचा सामना केला गेला नाही, तर देश कमकुवत होऊ शकतो,' अशी चिंताही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

घुसखोरी आणि बाह्य शक्तींपेक्षाही मोठा धोका जनसांख्यिकी बदलाचा आहे. घुसखोरी आणि बाह्य शक्ती हे दीर्घकाळापासूनच देशाच्या एकतेसाठी आव्हान ठरले आहेत. मात्र, आज मोठे आव्हान आहे ते जनसांख्यिकी बदलाचे. कारण यामुळे सामाजिक समानता कमकुवत होत आहे. दसऱ्यापूर्वी पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी देशवासियांना हा  इशारा दिला आहे. ते 1 ऑक्टोबर 2025 रोजी नवी दिल्ली येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) शताब्दी वर्ष समारोहात बोलत होते. 

'विविधतेत एकता’ ही भारताची आत्मा आहे. मात्र, जात, भाषा, प्रादेशिकता आणि अतिवादी विचारांनी प्रेरित विभाजनाचा सामना केला गेला नाही, तर देश कमकुवत होऊ शकतो,' अशी चिंताही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

मोदी म्हणाले, “सामाजिक समता म्हणजे वंचितांना प्राधान्य देऊन सामाजिक न्याय प्रस्थापित करणे आणि राष्ट्रीय एकता वाढवणे. आज जनसांख्यिकी बदल, अतिवादी विचार, क्षेत्रवाद, जाती-भाषा वाद  आणि बाह्य शक्तींनी भडकावलेले विभाजन, अशी असंख्य आव्हाने  आपल्या समोर आहेतत.” विविधतेत एकता हा भारताचा मूलमंत्र आहे, तो तुटला तर राष्ट्राची ताकद कमी होईल, असा इशारा त्यांनी दिला.

यावेळी त्यांनी RSS च्या शताब्दी निमित्ताने स्मारक डाक तिकीट जारी केले. ते म्हणाले, “RSS नेहमीच समाजाच्या विविध घटकांना सोबत घेऊन काम करतो. मात्र, ‘राष्ट्र प्रथम’ या सिद्धांतामुळे त्याच्या विविध शाखांमध्ये कधीही अंतर्विरोध होत नाही. 1925 मध्ये केशव बळिराम हेडगेवार यांनी RSS ची स्थापना सांस्कृतिक जागृती, शिस्त, सेवा, सामाजिक उत्तरदायित्व वाढवण्यासाठी केली. 

मोदी म्हणाले, आरएसएस ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ या विचारांवर विश्वास ठेऊन काम करते. स्वातंत्र्यानंतर संघाला मुख्य प्रवाहात येण्यापासून रोखण्याचे प्रयत्न झाले, तरी तो राष्ट्राची अविरत सेवा करत आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Demographic change more dangerous than infiltration: PM Modi warns India.

Web Summary : PM Modi warned that demographic shifts pose a greater threat than infiltration, potentially weakening social equality and national unity. He highlighted challenges like extremism, regionalism, and caste divisions during an RSS event, emphasizing the importance of 'unity in diversity' for India's strength.
टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघBJPभाजपाprime ministerपंतप्रधान