पू. ना. गाडगीळच्या दालनातून दागिने चोरले
By Admin | Updated: August 31, 2015 00:24 IST2015-08-31T00:24:31+5:302015-08-31T00:24:31+5:30
पुणे : पू. ना. गाडगीळ ज्वेलर्सच्या फिनिक्स मॉलमधील कोशंट ज्वेलरी शॉपमधून ६० हजारांचे चांदीचे दागिने चोरट्यांनी लंपास केल्याची घटना रविवारी सकाळी उघडकीस आली. याप्रकरणी विमाननगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

पू. ना. गाडगीळच्या दालनातून दागिने चोरले
प णे : पू. ना. गाडगीळ ज्वेलर्सच्या फिनिक्स मॉलमधील कोशंट ज्वेलरी शॉपमधून ६० हजारांचे चांदीचे दागिने चोरट्यांनी लंपास केल्याची घटना रविवारी सकाळी उघडकीस आली. याप्रकरणी विमाननगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. दुकानाच्या व्यवस्थापक तस्लीम सय्यद (वय २७, रा. कोंढवा) यांनी फिर्याद दिली आहे.नगर रस्त्यावरील फिनिक्स मॉलमध्ये पीएनजीचे स्टाईल कोशंट नावाचे दालन आहे. या दालनात चांदीचे आभूषणे आणि तत्सम वस्तुंची विक्री करण्यात येते. शनिवारी रात्री १० च्या सुमारास मॉल बंद झाल्यानंतर हे दालनही बंद करण्यात आले. रविवारी सकाळी दालन उघडण्यात आल्यानंतर चोरी झाल्याचे उघडकीस आले. ६० हजारांचे चांदीचे दागिने चोरीला गेल्याचे निष्पन्न झाले असून सय्यद यांनी पोलिसांना माहिती कळवली होती. चौकट सीसीटीव्ही बंद या दालनात असलेले सीसीटीव्ही कॅमेरे दुकान बंद करुन जाताना बंद करण्यात आलेले होते. त्यामुळे चोरीचे सीसीटीव्ही फुटेज मात्र उपलब्ध होऊ शकले नाही. बनावट चावीचा वापर करुन ची चोरी करण्यात आली असून दुकानाची माहिती असलेल्याचेच हे कृत्य असावे अशी शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.