शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

Nitish Kumar: युपीतील वचपा बिहारमध्ये काढला! भाजपाने पोटनिवडणुकीत मित्रपक्षाविरोधात उमेदवार दिला; सारे आलबेल?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2022 08:21 IST

बिहारमध्ये विधानसभेच्या जागांसाठी पोटनिवडणूक होत आहे. यापैकी बोचहां मतदारसंघातून भाजपाने माजी आमदार बेबी कुमारी यांना उमेदवार बनविले आहे. भाजपाची यादी प्रसिद्ध होताच, या मतदारसंघात भाजपा उमेदवाराचे नाव दिसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

शेजारच्या उत्तर प्रदेशमध्ये भाजपाने स्पष्ट बहुमत मिळविल्याने अस्वस्थ झालेले बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी भाजपासोबत थेट वैर घेण्यास सुरुवात केली आहे. काही दिवसांपूर्वी भर विधानसभेतच अध्यक्षांवर तुम्ही अशाप्रकारे कामकाज चालवू शकत नाही, असे सुनावले. यामुळे दुसऱ्या दिवशी अध्यक्ष आलेच नाहीत. या साऱ्या प्रकारामुळे नितीशकुमार आणि भाजपातील असंतोष आता उफाळून येण्याची चिन्हे असताना भाजपाने पोटनिवडणुकीत आपला उमेदवार दिल्याने आणखीनच दरी वाढली आहे. 

बिहारमध्ये विधानसभेच्या जागांसाठी पोटनिवडणूक होत आहे. यापैकी बोचहां मतदारसंघातून भाजपाने माजी आमदार बेबी कुमारी यांना उमेदवार बनविले आहे. भाजपाची यादी प्रसिद्ध होताच, या मतदारसंघात भाजपा उमेदवाराचे नाव दिसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. आमदाराचा मृत्यू झाल्यास ती जागा तिथे जिंकलेल्या मित्रपक्षालाच दिली जाते. परंतू भाजपाने असे न करता आपला उमेदवार उतरविला आहे. 

भाजपने उमेदवाराच्या नावाची घोषणा केल्यानंतर विकासशील इंसान पार्टी आणि नितीश कुमार सरकारमधील मंत्री मुकेश साहनी यांच्याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. भाजपच्या या पावलावर ते पुढे काय निर्णय घेणार, याची प्रतीक्षा आहे.2020 च्या विधानसभा निवडणुकीत ही जागा विकासशील इन्सान पक्षाच्या पासवान यांनी जिंकली होती. नुकतेच त्यांच्या निधनानंतर या जागेवर पोटनिवडणूक होत आहे. मुकेश साहनी यांनी आधीच जाहीर केले आहे की, ही त्यांची जागा आहे, त्यामुळे ते या जागेवरून निवडणूक लढवणार आहेत. यासाठी त्यांनी मुसाफिर पासवान यांचा मुलगा अमर पासवान याच्या नावाचीही घोषणा केली आहे.

आता अशा स्थितीत भाजपने उमेदवाराचे नाव जाहीर केल्यानंतर मुकेश साहनी  मागे हटले नाहीत, तर एनडीए आघाडीतील दोन घटक पक्षांमध्येच लढत होणार आहे. आरजेडीने उमेदवार उभे केल्याने ही लढत तिरंगी होणार आहे.यूपी निवडणुकीत मुकेश साहनी यांनी भाजपविरोधात ५३ जागांवर निवडणूक लढवली होती. त्याचवेळी बिहारमध्ये 24 जागांवर एमएलसी निवडणुकाही होणार आहेत आणि या निवडणुकीसाठी मुकेश साहनी यांच्या पक्षाने 7 जागांवर भाजपविरोधातील उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे. 

टॅग्स :BiharबिहारNitish Kumarनितीश कुमारBJPभाजपा