शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
2
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
3
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
4
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
5
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
6
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
7
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
8
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
9
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
10
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
11
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
12
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
13
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
14
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
15
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
16
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
17
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
18
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
19
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
20
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...

राजकारण तापले : आरोप प्रत्यारोपांच्या फैरी; मोदी म्हणाले, 'आगामी दशक आकांक्षा पूर्ण करण्याचे'

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2020 06:29 IST

Bihar Assembly Election 2020 : लोकांच्या आकांक्षा आम्ही पूर्ण करु असा शब्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी दिला.

-  एस. पी. सिन्हा 

फोर्बेस्गंज : मागील दशक हे बिहारमधील आवश्यक गरजा पूर्ण करण्यासाठी होते. मात्र, २०२१ - २०३० हे दशक राज्यातील लोकांच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी आहे. लोकांच्या आकांक्षा आम्ही पूर्ण करु असा शब्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी दिला. येथे एका प्रचारसभेत बोलताना मोदी म्हणाले की, जंगल राज चालविणाऱ्यांनी एकेकाळी मतदान केंद्रांवर कब्जा करुन गरिबांचा मताधिकार हिसकावून घेतला. पण, रालोआने त्यांना मतदानाचा अधिकार परत दिला.  बिहारमधील नागरिक आता त्या लोकांना ओळखून चुकले आहेत ज्यांच एकमेव स्वप्न होते की, लोकांना घाबरवून, अफवा पसरवून, फूट पाडून सत्ता हस्तगत करणे. पण, बिहारचे लोक जाणतात की, कोण बिहारच्या विकासासाठी कटिबद्ध आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि राजदचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार तेजस्वी यादव यांचा उल्लेख न करता ते म्हणाले की, लोकांनी जंगलराजच्या डबल डबल युवराजांना नाकारले आहे. गत दशकात प्रत्येक घरात वीज पोहचली. आता आगामी दशकात बिहार चमकून उठेल. गत दशकात घरोघरी गॅस कनेक्शन पोहचले.

मोदी, नितीशकुमार यांनी बिहारला लुटले : राहुल गांधी कटिहार : कोरोना, बेरोजगारीची समस्या आणि शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यात केंद्र व बिहार सरकारला अपयश आले आहे, असा आरोप करत काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी कटिहारमधील सभेत अशी टीका केली की, मोदी आणि नितीशकुमार यांनी बिहारला लुटले आहे. राज्याची जनता त्यांना उत्तर देईल.  जेव्हा लाखों मजूर हजारो किमी पायी चालून घरी येत होते तेव्हा नितीशकुमार आणि मोदी कोठे होते. आता मत मागायला येत आहेत. आम्ही सत्तेत नाहीत त्यामुळे लाखों मजुरांची मदत करु शकलो नाहीत. पण, क्षमतेनुसार लोकांची मदत केली.

नितीशकुमार नोकऱ्यांवर बोलताच गर्दीतून कांदा फेकला मधुबनीच्या हरखालीमध्ये नितिशकुमार सभेला संबोधित करत होते. यावेळी त्यांनी नोकऱ्यांवर बोलायला सुरुवात केली. तेव्हाच गर्दीतून कोणीतरी त्यांच्या दिशेने कांदा फेकला. यावर नितिशकुमार नाराज झाले आणि आणखी फेका, फेकत रहा, याचा कोणताही परिणाम होणार नाही, असे म्हणाले. यानंतर नितिशकुमारांना सुरक्षा रक्षकांनी घेरत सुरक्षा पुरविली आणि नितिशकुमारांनी त्यांचे भाषण पूर्ण केले.  सुरक्षारक्षकांनी जेव्हा कांदा फेकणाऱ्याला पकडण्याचा प्रयत्न केला तेव्हा नितिशकुमारांनीच त्यांना नको म्हणून सांगितले.  

आश्वासने विसरला नाहीत, अशी आशा करतोतुम्ही आश्वासने विसरले नाहीत अशी आशा करतो बिहारमधील विरोधी पक्षनेते आणि राजदचे नेते तेजस्वी यादव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे. यात त्यांनी पूर्ण न झालेल्या अनेक आश्वासनांचा उल्लेख केला आहे. १ नोव्हेंबर रोजी लिहिलेले हे पत्र राजदने ट्वीटरवर पोस्ट केले आहे. 

टॅग्स :Bihar Assembly Election 2020बिहार विधानसभा निवडणूकNarendra Modiनरेंद्र मोदीRahul Gandhiराहुल गांधीNitish Kumarनितीश कुमारTejashwi Yadavतेजस्वी यादव