शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

राजकारण अन्  सेक्स स्कॅण्डल; प्रज्वल जर्मनीत, कार्तिक मलेशियात

By ऑनलाइन लोकमत | Published: May 05, 2024 10:02 AM

मुद्द्याची गोष्ट : जगातील सर्वांत मोठ्या लोकशाहीच्या देशातील लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा सर्वत्र धुरळा उडाला असताना, कर्नाटकमधील खासदार प्रज्वल रेवण्णाचे सेक्स स्कॅण्डल ‘ऑन स्क्रीन’ झाल्याने सर्वत्र प्रचंड खळबळ माजली आहे. आजपर्यंतच्या इतिहासात हे देशातील किंवा जगातील सर्वांत मोठे सेक्स स्कॅण्डल ठरू पाहत आहे. या स्कॅण्डलमधील खलनायक माजी पंतप्रधानांचा नातू असल्याने जगभरातील प्रसारमाध्यमांच्या नजरा या प्रकरणाकडे वळल्या आहेत...

- नरेश डोंगरेउप मुख्य उपसंपादकशातील विविध प्रांतांतील अनेक भागांत सध्या लोकसभा निवडणुकीच्या मतदानाचा तिसरा टप्पा तोंडावर आहे. परिणामी, ज्या भागांत मतदान झाले त्या भागांतील प्रचाराचे भोंगे बंद झाले, तर जिकडे अद्याप मतदान व्हायचे, तिकडे प्रचार शिगेला पोहोचला असताना प्रज्वल रेवण्णाच्या सेक्स स्कॅण्डलने निवडणुकीच्या प्रचाराला भलतीच फोडणी दिली आहे. सिनेमा म्हणा किंवा सीरिअल, चांगला सीन समोर यावा म्हणून एकच दृश्याचे वारंवार चित्रण केले जाते. या प्रकरणात मात्र एकच व्यक्ती वेगवेगळ्या महिला-मुलींसह अश्लीलतेचा कळस गाठताना दिसते आहे. त्याचमुळे देशभर संतापयुक्त चर्चा सुरू झाली आहे. या प्रकरणात आतापर्यंत पुढे आलेल्या माहितीनुसार, गेल्या सहा वर्षांपासून हा प्रकार सुरू असल्याचे सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात मात्र या प्रकाराची सुरुवात कितीतरी पूर्वीच झाली असावी, असे तपास यंत्रणेतील विविध अधिकाऱ्यांचे मत आहे. पुढे आलेल्या (खऱ्या की खोट्या माहीत नाही!) अडीच-तीन हजार अश्लील क्लिप तयार करण्यासाठी एक स्वतंत्रच युनिट तयार करावे लागणार म्हणे...

पापाचा साक्षीदार दुखावला अन्... nकार्तिक हा घरगुती सदस्य १५ वर्षांपासून प्रज्वलकडे वाहनचालक होता. प्रज्वलच्या प्रत्येक चांगल्या-वाईट कामाचा साक्षीदार कार्तिक प्रत्येक सेवेसाठी तत्पर असे.nमात्र, ‘हरसंभव’ सेवा देऊनही कार्तिक आणि त्याच्या पत्नीवरच प्रज्वलकडून कथित अन्याय झाला. त्याची जमीन हिसकावली गेली.nत्यामुळे कार्तिक प्रचंड दुखावला गेला. त्याने त्याच्याजवळ असलेला पेन ड्राइव्ह रूपातील बॉम्ब प्रज्वलच्या विरोधकांना सोपवला.nया पेन ड्राइव्हमध्ये अडीच हजारांवर अश्लील व्हिडीओ असल्याचा दावा केला जातो.

अश्लीलतेचा हा बाॅम्ब २४ एप्रिलपासून सोशल मीडियावर जागोजागी फुटू लागला. परिणामी, राजकीय वर्तुळाला जबरदस्त हादरा बसला. ते बघता प्रज्वल २७ एप्रिलला जर्मनीत पळून गेला. गुन्हे दाखल झाले, चाैकशीसाठी एसआयटी नेमली गेली अन् प्रज्वलविरुद्ध लूकआउट नोटीसही जारी करण्यात आली. प्रज्वलच्या पलायनानंतर कार्तिकही मलेशियात गेल्याची चर्चा सुरू झाल्याने या प्रकरणात वेगळा ट्विस्ट आला आहे.

बाथरूममध्ये नेऊन करायचा अत्याचारप्रज्वलचे अनेक संतापजनक किस्से आता ऐकायला मिळत आहेत. त्यानुसार, प्रज्वल रेवण्णाकडे काम घेऊन येणाऱ्या महिला कार्यकर्त्या, खासकरून अत्याचारग्रस्त महिला, मुलींना तो लाडीगोडीने बाथरूममध्ये घेऊन जायचा. तेथे तो त्यांच्यावर अत्याचार करायचा. बाथरूममध्ये घरकाम करणाऱ्या महिला, मुलींवरही तो अत्याचार करायचा.

अशाच प्रकारचे अनेक किस्से आता चर्चेला आले आहेत. सोबतच या ‘ब्लॅक-ब्ल्यू स्टोरी’चा भंडाफोड कुणी केला, ऐन प्रचाराच्या कालावधीत प्रज्वल रेवण्णाच्या तोंडाला काळिमा कुणामुळे फासला गेला, ते जाणून घेण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे. या संबंधाने विचारपूस केली असता ही स्टोरी ऑन स्क्रीन आणणारे पडद्यामागे अनेक डायरेक्टर (नेते!) आहेत. मात्र, एका मेड (घरी काम करणारी मदतीस महिला) आणि प्रज्वलकडे अनेक वर्षे ड्रायव्हर म्हणून काम करणाऱ्या तरुणाने प्रज्वल रेवण्णाची ‘बंडी उलार’ केल्याचे पुढे आले आहे.

सूत्रांनुसार, जेडीएसचे आमदार एचडी रेवण्णा आणि त्यांचा खासदार मुलगा प्रज्वल तिच्यासोबत लज्जास्पद वर्तन करायचेच; मात्र आता प्रज्वलची नियत तिच्या मुलीवर गेली. तो तिला व्हिडीओ कॉल करून अश्लील चाळे करायचा. मोबाइल नंबर ब्लॉक करूनही त्याच्यावर फरक पडला नव्हता. त्याच्या लैंगिक छळाने सर्व मर्यादा ओलांडल्याने आणि मुलीचे भवितव्य अंधकारमय दिसू लागल्याने तिच्या सोशिकतेचा कडेलोट झाला. तिने पोलिसांकडे धाव घेतली. 

यांचीही गाजली प्रकरणे...या प्रकरणामुळे देश-विदेशात गाजलेली आणि राजकीय कनेक्शन असलेली यापूर्वीची अनेक ‘सेक्सकांड’ आता चर्चेला आली आहेत.काँग्रेसशी संबंधित एका वकील कम नेत्याची सीडी काही वर्षांपूर्वी चर्चेला आली होती. वेगात फिरणाऱ्या या सीडीतील दृश्य बघता दिल्ली हायकोर्टाने या सीडीच्या प्रसारणावर बंदी घातली होती.

२००३ मध्ये मधुमिता आणि अमरमणी अनैतिक प्रकरणाचा भडका उडाल्यानंतर तत्कालीन मंत्री अमरमणी यांच्या पत्नीने टोकाचे पाऊल उचलले होते. त्यामुळे मधुमिताची हत्या करण्यात आली होती.२००६ मध्ये श्रीनगर (जम्मू आणि काश्मीर) पोलिसांनी एका सबिना नामक महिलेला अटक केली होती. त्यावेळी तिच्या चाैकशीतून असे काही धक्कादायक खुलासे झाले होते की, अनेक मंत्री आणि नेत्यांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही कारागृहात जावे लागले होते.२००७ मध्ये फैजाबाद (उत्तर प्रदेश) मधील शशी आणि आनंद सेन यांच्या प्रकरणाने देशाच्या राजकारणात खळबळ निर्माण केली होती. या प्रकरणातही नंतर अनैतिक संबंधाचा बोभाटा होऊ नये म्हणून शशीची हत्या करण्यात आल्याचे उघड झाले होते.

राजस्थानमधील भवरी आणि महिपाल प्रकरणाने तर सरकारला मान खाली घालण्याची स्थिती निर्माण केली होती. हे प्रकरण तेव्हा प्रचंड गाजले आणि राजकारण तसेच अतिमहत्त्वाकांक्षेची भवरी बळी ठरल्याचे भवरीची हत्याकांडानंतर उघड झाले होते. महिपाल मदेरणा या माजी मंत्र्याची या प्रकरणामुळे कारागृहात रवानगी झाली होती.आंध्र प्रदेशचे माजी राज्यपाल आणि एका वयोवृद्ध काँग्रेस नेत्याच्या प्रकरणाने, भोपाळच्या एका बड्या नेत्याशी संबंधित आरटीआय ॲक्टिविस्ट शेहला मसूदच्या प्रकरणानेही राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ निर्माण केली होती.

टॅग्स :Sex Racketसेक्स रॅकेटH. D. Deve Gowdaएच. डी. देवेगौडाKarnatakकर्नाटक