शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
4
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
5
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
6
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
7
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
8
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
9
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
10
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
11
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
13
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
14
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
15
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
16
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
17
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
18
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
19
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
20
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स

Prashant Kishor : काँग्रेस 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला कडवी टक्कर देणार का?, प्रशांत किशोर म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2022 11:02 IST

Prashant Kishor on congress revival : काँग्रेसने एकजूट होऊन काम केल्यास 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला तगडे आव्हान देऊ शकते, असे प्रशांत किशोर यांनी म्हटले आहे.

नवी दिल्ली : पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला (congress) दारुण पराभवाला सामोरे जावे लागले, पण काँग्रेस  2024 च्या लोकसभा निवडणुकीत  (Loksabha Poll 2024) भाजपला (BJP) जोरदार टक्कर देईल, असा विश्वास निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर (Prashant Kishor) यांनी व्यक्त केला आहे. काँग्रेसने एकजूट होऊन काम केल्यास 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला तगडे आव्हान देऊ शकते, असे प्रशांत किशोर यांनी म्हटले आहे. ते इंडिया टुडेशी बोलत होते. 

उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मणिपूर, गोवा आणि पंजाब या पाच राज्यांमध्ये झालेल्या दारूण पराभवानंतर काँग्रेस कार्यकारिणीची बैठक झाली, त्यानंतर काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी गांधी कुटुंबावर निशाणा साधला होता. मात्र, काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना पार्टीमध्ये संरचनात्मक कमकुवतपणा आणि बदल करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. दरम्यान, 2024 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला संधी आहे. काँग्रेस एकजूट राहिल्यास भाजपला तगडे आव्हान देऊ शकते, असे प्रशांत किशोर म्हणाले. 

'भाजप आता ताकदवान बनला आहे, पण तरीही पूर्व आणि दक्षिण भारतात संघर्ष करत आहे, कारण या प्रदेशांतील सुमारे 200 जागांपैकी 50 जागाही मिळवू शकलेल्या नाहीत. यामध्ये बिहार, बंगाल, ओडिशा, तेलंगणा, आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि केरळ या राज्यांचा समावेश आहे', असे प्रशांत किशोर यांनी सांगितले. यासाठी काँग्रेसला पुन्हा जमिनीवर यावे लागेल आणि काँग्रेसला पुनर्जन्म घ्यावा लागेल. आत्मा, विचार आणि विचारधारा यांना स्थान आहे आणि राहतील पण बाकी सर्व काही नवीन पाहिजेत. तसेच, कोणत्याही पक्षाला, विशेषत: काँग्रेसला राष्ट्रीय स्तरावर भाजपचा पर्याय बनवायचा असेल तर, 10-15 वर्षांची मजबूत दृष्टी असायला हवी. यासाठी कोणताही शॉर्ट कट नाही आहे, असे प्रशांत किशोर म्हणाले. 

'गांधी कुटुंबाशिवाय काँग्रेस मजबूत नाही'सर्व विरोधकांना एकत्र करू शकतील, असे कोण नेते आहेत? असा सवाल प्रशांत किशोर यांना विचारण्यात आला. यावर प्रशांत किशोर यांनी कोणत्याही नेत्याचे नाव न घेता, 'सर्वांना सोबत ठेवण्यात काँग्रेस यशस्वी झाली, तर त्याभोवती चेहरा बांधता येईल,' असे सांगितले. तसेच, जर तुम्ही योग्य दिशेला नॅरेटिव्ह घेऊन जाता आणि आघाडीचे लोक तुमच्याकडे असतील तर विचारधारा काहीही असो, पण भाजपचा पराभव करायचा असेल तर चेहरा आपोआप तयार होईल, असेही ते म्हणाले. तसेच, गांधी घराण्याला काँग्रेसमधून काढून टाकले तर काँग्रेस मजबूत होऊ शकणार नाही. त्यामुळेच काँग्रेसने जमिनीवर येऊन मूलभूत तत्त्वे मांडण्याची वेळ आली आहे, असे प्रशांत किशोर म्हणाले. 

टॅग्स :Prashant Kishoreप्रशांत किशोरcongressकाँग्रेसBJPभाजपा