शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

राजकीय पक्ष मला मारण्याच्या प्रयत्नात- ममता बॅनर्जी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2018 12:04 IST

ममता बॅनर्जी यांनी काल एका मुलाखतीमध्ये केलेल्या काही विधानांमुळे पुन्हा सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

कोलकाता- पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री मताम बॅनर्जी यांनी कालच दिलेल्या मुलाखतीमध्ये एक नवी धक्कादायक माहिती लोकांसमोर आणली आहे. ''मला मारण्यासाठी काही राजकीय पक्ष प्रयत्न करत आहेत आणि त्यांनी माझ्या हत्येची सुपारीही दिली आहे. त्यामुळे मी माझे मृत्यूपत्र करुन ठेवले आहे'', अशी माहिती ममता बॅनर्जी यांनी एका दूरचित्रवाहिनीला मुलाखत देताना सांगितली. इतकेच नव्हे तर, ''मी मृत्यूपत्रही करुन ठेवले असून जर आपली हत्या झाली तर माझा राजकीय पक्ष (तृणमूल काँग्रेस) कोणी चालवायचा हे त्यात लिहून ठेवले आहे. जरी आपली हत्या झाली तरी सर्व काही माझ्या मृत्यूपत्रातील नोंदीप्रमाणे होईल असे सांगत मला मारण्याची योजना करणारे दीर्घकालीन भविष्याचा विचार केल्यास यशस्वी होणार नाहीत'' असेही त्यांनी या मुलाखतीत सांगितले.

ममता यांनी अचानकच नवी माहिती लोकांसमोर आणल्यामुळे त्या नक्की कोणत्या पक्षांबद्दल बोलत आहेत असा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे पण याबाबत त्यांनी काहीच माहिती दिली नाही. मी या राजकीय पक्षांचे नाव सांगणार नाही पण मी कोणत्या पक्षांबद्दल बोलत आहे हे तुम्हाला समजले असेलच असे त्या म्हणाल्या आहेत. ''मला मारण्यासाठी भाडोत्री मारेकऱ्यांना आधीच पैसे देऊन झाले आहेत असा दावाही त्यांनी केला. यापुढे त्या बोलताना त्या म्हणाल्या, मारेकऱ्यांनी माझ्या घराची रेकीही केली आहे, मात्र मी घाबरत नाही जे राजकीय क्षेत्रात माझ्याशी लढू शकत नाहीत तेच अशा प्रकारचे कृत्य करत आहेत''. ममता यांनी स्वतःच्या सुरक्षेबाबत मोठा दावा केला असला तरी त्याबाबत कोणतीही ठोस माहिती मात्र त्यांनी दिली नाही.

ममता यांनी यापुढे जात 2019 सालच्या निवडणुकांबाबतही भाष्य केले, ''प्रथम (ते राजकीय पक्ष) तुमची प्रतिमा मलिन करतात मग तुम्हाला संपविण्याचा ते प्रयत्न करतात आणि माझी हत्या केल्यानंतर ते खोटे खोटे अश्रू ढाळतील. तुमच्या (मुलाखत घेणाऱ्यांना उद्देशून) क्षेत्रातील काही लोकही यात सहभागी आहेत. त्यांना माझा आवाज दाबून टाकायचा आहे. 2019 साली होणाऱ्या निवडणुकांमध्ये भाजपा आणि काँग्रेस यांपैकी कोणालाही स्पष्ट बहुमत मिळणार नसल्यामुळे प्रादेशिक पक्षांना महत्त्वाची भूमिका बजावायला मिळेल असे भाकितही त्यांनी केले. जर काँग्रेस आणि भाजपाला असे वाटत असेल की नेहमी तेच सत्तेत राहतील, तर तसे होणार नाही. प्रादेशिक पक्षही आहेत. फेडरल फ्रंट आता अधिकच शक्तीशाली झाली आहे.  एखाद्या कुटुंबात एकमेकांचं ऐकतात तसं त्यात (फेडरल फ्रंटमध्ये) आहे. आम्ही नेहमीच या कुटुंबासाठी नेहमीच सामुहिक निर्णयांना पाठिंबा देऊ. पण या कुटुंबात माझी भूमिका काय असा प्रश्न विचारल्यावर मात्र मी त्याचं उत्तर देऊ शकणार नाही कारण मी अत्यंत लहान आहे. मी इतरांच्या मतांचा आदर करते." 

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीwest bengalपश्चिम बंगालtmcठाणे महापालिकाIndiaभारत