तिसरी आघाडी नको; आपले गड मजबूत करा - पवार यांचा ममता बॅनर्जी यांना सल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2018 06:26 AM2018-04-01T06:26:37+5:302018-04-01T06:26:37+5:30

भाजपाविरुद्ध लढण्यासाठी प्रादेशिक पक्षांची तिसरी आघाडी न करू नये, असे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी ममता बॅनर्जी यांच्या गळी उतरविले असल्याचे समजते. तिसऱ्या आघाडीमुळे समस्या अधिकच वाढतील, असे पवार यांनी त्यांना सांगितल्याचे कळते. पवार गेले महिनाभर समविचारी पक्षांशी या संदर्भात चर्चा करीत आहेत.

Do not take the third lead; Strengthen your fortress - Pawar's advice to Mamta Banerjee | तिसरी आघाडी नको; आपले गड मजबूत करा - पवार यांचा ममता बॅनर्जी यांना सल्ला

तिसरी आघाडी नको; आपले गड मजबूत करा - पवार यांचा ममता बॅनर्जी यांना सल्ला

googlenewsNext

- हरिश गुप्ता

नवी दिल्ली : भाजपाविरुद्ध लढण्यासाठी प्रादेशिक पक्षांची तिसरी आघाडी न करू नये, असे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी ममता बॅनर्जी यांच्या गळी उतरविले असल्याचे समजते. तिसऱ्या आघाडीमुळे समस्या अधिकच वाढतील, असे पवार यांनी त्यांना सांगितल्याचे कळते. पवार गेले महिनाभर समविचारी पक्षांशी या संदर्भात चर्चा करीत आहेत.
मोदीविरोधी पक्षांनी आपापल्या राज्यात स्वत:चे गड अधिक बळकट करावेत आणि जिथे भाजपाला पराभूत करणे शक्य आहे, तिथे तेथील स्थितीप्रमाणे जागावाटप करावे, असे पवार यांचे म्हणणे आहे. असे महाराष्ट्रात करण्याबाबत त्यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्याशी यापूर्वीच चर्चा केली असून, त्यास त्यांची मान्यता असल्याचे सांगण्यात येते.
याचप्रकारे, उत्तर प्रदेशात सपा-बसपा एकत्र आले असून, काँग्रेसही त्यांना साथ देईल. बिहारमध्ये राजद व काँग्रेस यांचे सहकार्य असेल. त्यामुळे ममता यांनी ईशान्य भारताच्या सात राज्यांतील २५ जागांबाबत तेथील प्रादेशिक पक्षांशी बोलावे, त्यांना काँग्रेस मदत करेल. त्यामुळे भाजपाचा पराभव करणे शक्य होईल, असे त्यांनी बॅनर्जी यांना सांगितल्याचे कळते.

दीदी भेटणार अनेक नेत्यांना
मात्र, ममता बॅनर्जी यांनी तिसºया आघाडीची कल्पना पुरती सोडून दिलेली नाही. बॅनर्जी यांना भेटण्यासाठी तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव जसे कोलकात्याला गेले, त्याचप्रमाणे द्रमुक, तेलगू देसम, तसेच सपा व बसपाच्या प्रमुखांना भेटण्यासाठी त्या चेन्नई, अमरावती व लखनौला जाणार आहेत.

अखिलेश यांचेही मत तेच...
सपाचे अध्यक्ष अखिलेश यादव हेही तिसरी वा वेगळी आघाडी करण्याच्या मताचे नाहीत. मोदी विरुद्ध आघाडी असे चित्र २0१९ च्या लोकसभा निवडणुकीत दिसले, तर आमच्याविरोधात लढण्यासाठी सर्व संधीसाधू पक्ष एकत्र आले, अशी टीका भाजपा करेल. त्यामुळे निवडणूकपूर्व आघाडी करण्यापेक्षा प्रत्येकाने आपल्या ताकदीनुसार व अन्य पक्षांच्या मदतीने भाजपाविरोधात लढणेच योग्य ठरेल. त्यामुळे आधी भाजपाला पराभूत करू आणि कसे जुळवायचे हे ठरवू. लालू, ममताजी, मायावतीजी, आम्ही सारे जबाबदार पक्ष आहोत. त्यामुळे नंतरचे ठरवणे अवघड वा अडचणीचे नाही.

- अलीकडेच अखिलेश यादव महाराष्ट्रातील भंडारा-गोंदिया मतदारसंघात गेले होते. दिवसभर ते तिथे होते. प्रफुल्ल पटेल यांच्याशी त्यांनी पुढील व्यूहरचनेबाबत चर्चाही केली.

Web Title: Do not take the third lead; Strengthen your fortress - Pawar's advice to Mamta Banerjee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.