शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

राजस्थानात राजकीय भूकंप, काँग्रेसच्या तब्बल ८२ आमदारांचे राजीनामे

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2022 05:39 IST

अशोक गेहलोत समर्थक आक्रमक, सचिन पायलट यांना मुख्यमंत्री करण्यास विरोध

जयपूर : राजस्थानातील राजकारणाने आणखी एक अनपेक्षित वळण घेतले. मुख्यमंत्री अशोक गेहलोत काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक लढविण्याची तयारी करत आहेत. त्यामुळे राजस्थानच्या मुख्यमंत्रिपदी सचिन पायलट यांची निवड करण्याचा श्रेष्ठींचा विचार आहे. पायलट यांना मुख्यमंत्री करण्यास विरोध असणाऱ्या काँग्रेसच्या आमदारांपैकी ८२ जणांनी  आपल्या पदाचे विधानसभा अध्यक्ष सी. पी. जोशी यांच्याकडे सुपुर्द केले. 

यामुळे राजस्थानातील राजकारण ढवळून निघाले. काँग्रेस विधिमंडळ पक्षाची बैठक मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या निवासस्थानी रविवारी पार पडली. त्यावेळी तिथे काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खरगे, अजय माकन तसेच माजी केंद्रीय मंत्री सचिन पायलट हे देखील उपस्थित होते. या बैठकीला काँग्रेसचे अवघे २५ आमदार हजर होते. त्याचवेळी पायलट यांच्या विरोधात वातावरण किती तापलेले आहे याची झलक सर्वांना पाहायला मिळाली.

‘एक व्यक्ती, एक पद’ या तत्त्वाचा आग्रहएक व्यक्ती, एक पद या तत्त्वासाठी काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी व काँग्रेस नेते राहुल गांधी आग्रही आहेत. त्यामुळे काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक लढवायची असल्यास अशोक गेहलोत यांनी राजस्थानचे मुख्यमंत्रिपद सोडले पाहिजे असा पक्षश्रेष्ठींचा आग्रह आहे. मात्र ते अशोक गेहलोत व त्यांच्या समर्थक आमदारांना मान्य नाही.

आमदारांची संख्या वाढण्याची शक्यता राजस्थानमध्ये काँग्रेसचे १०८ आमदार असून त्यातील बहुतांश आमदारांचे अशोक गेहलोत यांना समर्थन असल्याचे रविवारच्या घडामोडींतून दिसून आले. काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या बैठकीच्या आधी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या समर्थक आमदारांपैकी काही जण विधानसभा अध्यक्ष सी. पी. जोशी यांच्या निवासस्थानी गेले व त्यांना आपल्या पदाचा राजीनामा सादर केला. त्यानंतर ८२ आमदारांनी आपल्या पदाचे राजीनामे दिले आहेत. राजस्थानचे मंत्री प्रतापसिंह खाचरियावास यांनी ही माहिती पत्रकारांना दिली. राजीनामे देणाऱ्या आमदारांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे.  

चर्चेसाठी दिल्लीत यापक्षातील वाढता संघर्ष लक्षात घेता पक्षश्रेष्ठींनी मुख्यमंत्री अशोक गेहलोत व सचिन पायलट यांना चर्चेसाठी दिल्ली येथे बोलाविले असल्याचे सूत्रांनी सांगितले. 

मुख्यमंत्रिपदासाठी सी. पी. जोशींचे नाव गेहलोत हे राजस्थानच्या मुख्यमंत्रिपदावरून पायउतार झाल्यास त्यांच्या जागी काँग्रेसचे नेते सचिन पायलट किंवा विधानसभेचे अध्यक्ष सी. पी. जोशी यांची  नावाची चर्चा सुरू झाली होती. मात्र त्यातील पायलट यांच्या नावाला राजस्थान काँग्रेसमध्येच मोठा विरोध आहे. तर सी. पी. जोशी यांच्याबद्दल अद्याप कोणत्याही आमदाराने जाहीर विरोध केलेला नाही. 

सचिन पायलट हे चाळिशीच्या मध्यात असून, जोशी (७०) ज्येष्ठ नेते आहेत. जोशी हे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष राहिलेले आहेत आणि २००८ मध्ये ते मुख्यमंत्रिपदाचे दावेदार होते; पण, त्यावेळी ते विधानसभा निवडणुकीत पराभूत झाले होते.

टॅग्स :Rajasthanराजस्थानAshok Gahlotअशोक गहलोतSachin Pilotसचिन पायलट