शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

"8 ऑक्टोबरनंतर बिहारमध्ये राजकीय भूकंप"! NDA संदर्भात आरजेडी नेत्याची मोठी भविष्यवाणी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2024 19:39 IST

"जेडीयू 8 ऑक्टोबरची वाट बघत आहे. भाजप नितीश यांच्यावर मुख्यमंत्रीपद सोडण्यासाठी दबाव टाकत आहे. दोन्ही राज्यांचे निकाल येताच भाजपची उलटी गिनती सुरू होईल."

येणाऱ्य 8 ऑक्टोबरला हरियाणा आणि जम्मू-काश्मीरच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर होताच बिहारमध्येही राजकीय भूकंप होईल. बिहार मध्यावधी निवडणुकीकडे वाटचाल करणार आहे. जेडीयू 8 ऑक्टोबरची वाट बघत आहे. भाजप नितीश यांच्यावर मुख्यमंत्रीपद सोडण्यासाठी दबाव टाकत आहे. दोन्ही राज्यांचे निकाल येताच भाजपची उलटी गिनती सुरू होईल. जेडीयू आणि भाजप यांच्यात प्रत्येक मुद्द्यावर संघर्ष आहे, असे आरजेडी प्रवक्ता मृत्युंजय तिवारी यांनी म्हटले आहे.

"निकालाचा बिहारमध्ये मोठा साइड इफेक्ट दिसणार" -मृत्युंजय तिवारी म्हणाले, जेडीयू नितीश यांना पंतप्रधान करण्याची आणि त्यांना भारतरत्न देण्याची मागणी करत आहे. राजद नितीश यांना कधीही सोबत घेणार नाही. कारण, 'बिहार की जनता की है पुकार, अबकी बार तेजस्वी की सरकार'. हरियाणा, जम्मू-काश्मीरच्या एक्झिट पोलचे निकाल खरे ठरतील. दोन्ही राज्यात भाजपचा क्लीन स्वीप होणार आहे. 8 ऑक्टोबरच्या निकालाचा बिहारमध्ये मोठा साइड इफेक्ट दिसेल.

खरे तर, 8 ऑक्टोबरला लागणाऱ्या निवडणूक निकालापूर्वी, शनिवारी एक्झिट पोलचे निकाल जाहीर झाले. या आकड्यांवर काँग्रेस खूश दिसत आहे. हरियाणात काँग्रेस 10 वर्षांनंतर पुन्हा एकदा सत्तेत येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. याशिवाय, जम्मू-काश्मीरसाठी काही एक्झिट पोल नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस आघाडीचे सरकार स्थापन होण्याची शक्यता वर्तवत आहेत. तर काही आघाडीला बहुमतापासून 10 ते 15 जागा दूर दाखवत आहे.

जम्मू-काश्मीरच्या एक्झिट पोलमध्ये आघाडीला 'आघाडी' -जम्मू-काश्मीरमध्ये आघाडीला 40 तर भाजपला 30 जागा मिळण्याची शक्यता एक्झिटपोलमध्ये वर्तवण्यात आली आहे. याशिवाय, पीडीपी आणि इतरांना प्रत्येकी 10 जागा मिळू शकतात आणि ते किंगमेकरची भूमिका बजावू शकतात. मात्र, हे केवळ अंदाज आहेत. खरी स्थिती 8 ऑक्टोबरलाच समोर येईल आणि जनतेने आपल्यासाठी कोणता पक्ष योग्य मानला हे स्पष्ट होईल. मात्र, एक्झिट पोलच्या अंदाजावर बोलताना, हरियाणा आणि जम्मू काश्मीरच्या निकालानंतर, बिहारचे राजकीय वातावरणही बदलेल असे बिहारमधील विरोधक म्हणू लागले आहेत.

टॅग्स :National Democratic Allianceराष्ट्रीय लोकशाही आघाडीBJPभाजपाNitish Kumarनितीश कुमारBiharबिहार