शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

मध्य प्रदेशमध्ये पुन्हा सत्तानाट्य! काँग्रेसचे ६ मंत्र्यांसह १७ आमदार कर्नाटकात

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2020 18:40 IST

काठावर बहुमत असलेले कमलनाथ सरकार स्थिर ठेवण्यासाठी काँग्रेसकडून जोरदार हालचाली सुरू आहेत.

भोपाळ - काँग्रेसची सत्ता असलेल्या मध्य प्रदेशमध्ये पुन्हा एकदा सत्तानाट्यच रंगले आहे. मिळालेल्या माहितीनुसार काठावर बहुमत असलेले कमलनाथ सरकार अस्थिर करण्यासाठी भाजपाकडून जोरदार हालचाली सुरू आहेत. त्याचाच एक भाग म्हणून भाजपाने काँग्रेसच्या १७ आमदारांना कर्नाटकमध्ये हलवले आहे. यामध्ये सहा मंत्र्यांचाही समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे. प्रसारमाध्यमांमध्ये येत असलेल्या वृत्तांनुसार सर्व आमदार हे ज्योतिरादित्य शिंदे यांच्या गटाचे असल्याचे सांगण्यात येत आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कर्नाटकमधील भाजपाचे एक आमदार काँग्रेसच्या आमदारांना घेऊन बंगळुरूला पोहोचले आहेत. तसेच या आमदारांना बंगळुरूबाहेरच्या कुठल्यातरी रिसॉर्टमध्ये ठेवण्यात आले आहे. सध्या मिळत असलेल्या माहितीनुसार इमरती देवी, प्रद्युम्न सिंह तोमर, महेंद्र सिंह सिसोदिया, तुलसी सिलावट, प्रभुराम चौधरी आणि गोविंद सिंह राजपूत हे आमदार कर्नाटकात पोहोचल्याचे वृत्त आहे.

दरम्यान, या घडामोडींनंतर मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. भाजपाला आता स्वस्थ बसवत नाही आहे. गेल्या १५ वर्षांत त्यांनी जो काही भ्रष्टाचार केला आहे, तो आता समोर येत आहे. त्यामुळे ते अस्वस्थ झाले आहेत, असे कमलनाथ म्हणाले.

 काही दिवसांपूर्वीच मध्य प्रदेशमधील काँग्रेसच्या सरकारमधील आमदारांनी बंडाळी केली होती. त्यावेळी ३ मार्च रोजी काँग्रेस, बसपा आणि सपा या पक्षांचे मिळून नऊ आमदार बेपत्ता झाले होते. मात्र त्यापैकी तीन आमदारांना दुसऱ्या दिवशी परत भोपाळला आणण्यात काँग्रेसला यश आले होते. त्यानंतर अपक्ष आमदार सुरेंद्र सिंह शेरा, काँग्रेस आमदार बिसाहू लाल सिंह आणि रघुराज कंसाना हेसुद्धा परतले होते. मात्र काँग्रेसचे अन्य एक आमदार हरदीप सिंह डंग यांना मात्र राजीनामा दिला होता.

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशcongressकाँग्रेसBJPभाजपाPoliticsराजकारण