शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

Political Donations: राजकीय देणग्या देण्यात 'या' कंपन्या आघाडीवर, भाजपला मिळाल्या सर्वाधिक देणग्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2022 19:26 IST

Political Donations: कॉर्पोरेट जगताकडून राजकीय पक्षांना दरवर्षी कोट्यवधी रुपयांच्या देणग्या मिळतात. एका रिपोर्टनुसार, एकट्या भाजपला 78% देणग्या मिळाल्या आहेत.

नवी दिल्ली : राजकीय पक्षांचा खर्च पाहता एवढा पैसा कुठून येतो असा प्रश्न लोकांच्या मनात येतो. वास्तविक, राजकीय पक्षांना कॉर्पोरेट जगताकडून दरवर्षी करोडो रुपयांच्या देणग्या मिळतात. सर्व मोठ्या कंपन्या वेगवेगळ्या पक्षांना राजकीय देणग्या देतात. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की देणगी देणाऱ्या कॉर्पोरेट्समध्ये काही अज्ञात नावांचाही समावेश आहे.

राजकीय देणग्या देणाऱ्या कंपन्याराजकारणात पारदर्शकता ठेवण्यासाठी सक्रिय असलेल्या असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (ADR) या संस्थेने नुकताच एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. या अहवालात राजकीय देणग्या देणाऱ्या कंपन्यांची नावे समोर आली आहेत. 2019-20 या आर्थिक वर्षासाठी राजकीय पक्षांना देणग्या देणाऱ्या आघाडीच्या कंपन्यांमध्ये भारती ग्रुप (भारती एंटरप्रायझेस) आणि ITC सारखी मोठी नावे आहेत.

भारती ग्रुप आघाडीवरएडीआरच्या अहवालानुसार, 'भारती एंटरप्रायझेसद्वारे समर्थित प्रूडंट इलेक्टोरल ट्रस्ट देणग्यांमध्ये आघाडीवर आहे. 2019-20 मध्ये राजकीय पक्षांना 247.75 कोटी रुपयांची देणगी दिली आहे. यापूर्वी ही ट्रस्ट 2016-17 आणि 2017-18 मध्येही देणग्या देण्यात आघाडीवर होती. या दोन वर्षांत, ट्रस्टने केवळ भाजप आणि काँग्रेस यांना 429.42 कोटी रुपयांची देणगी दिली होती. त्यावेळी ते सत्य इलेक्टोरल ट्रस्ट म्हणून ओळखले जात होते. 2019-20 मध्येही या ट्रस्टने प्रामुख्याने भाजप आणि काँग्रेसला देणगी दिली आहे. प्रुडंट इलेक्टोरल ट्रस्टने भाजपला 216.75 कोटी रुपये आणि काँग्रेसला 31 कोटी रुपये दिले आहेत.

या कंपन्या सर्वोच्च राजकीय देणगीदार होत्याआयटीसी लिमिटेड, जनकल्याण इलेक्टोरल ट्रस्ट, बीजी शिर्के कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड आणि पंचशील कॉर्पोरेट पार्क प्रायव्हेट लिमिटेड आर्थिक वर्ष 2019-20 मध्ये देणगीच्या बाबतीत आघाडीवर आहेत.

भाजपला 78 टक्के दान मिळालेएडीआरच्या अहवालानुसार, केंद्रात सरकार चालवत असलेला भारतीय जनता पक्ष देणग्या मिळवण्यात आघाडीवर आहे. 2019-20 या आर्थिक वर्षात टॉप-5 पक्षांना मिळून 921.95 कोटी रुपयांच्या कॉर्पोरेट देणग्या मिळाल्या आणि त्यापैकी 720.40 कोटी रुपये एकट्या भाजपला मिळाले. त्याचबरोबर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष (CPM) आणि तृणमूल काँग्रेस (AITC) यांनाही देणग्या मिळाल्या आहेत. यावेळी सीपीआयला कोणतीही देणगी मिळालेली नाही. काँग्रेसला 133.4 कोटी आणि राष्ट्रवादीला 57.8 कोटी रुपये मिळाले आहेत.

टॅग्स :PoliticsराजकारणBJPभाजपाcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेसtmcठाणे महापालिका