शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

लालू प्रसाद यादवांच्या सुरक्षा रक्षकांनी नेल्या रुग्णालयातून गाद्या, उशा; रुग्णालायची पोलिसांकडे तक्रार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2021 21:25 IST

लालू प्रसाद यादव यांना सुरूवातीला उपचारासाठी झारखंडमधील रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, त्यावेळी त्यांच्या सुरक्षेसाठी १२ पोलीस सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले होते.

ठळक मुद्देलालू प्रसाद यादव यांना सुरूवातीला उपचारासाठी झारखंडमधील रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतंत्यांच्या सुरक्षेसाठी तैनात करण्यात आले होते १० पोलीस सुरक्षा रक्षक

काही दिवसांपूर्वी झारखंडमधील रिम्स रुग्णालयात बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांच्यावर उपचार सुरू होते. त्यानंतर त्यांना दिल्लीतीलएम्स रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आलं. परंतु एम्समध्ये त्यांना नेल्यानंतर एक धक्कादायक माहिती समोर आली. लालू प्रसाद यादव यांच्या सुरक्षेसाठी काही पोलीस सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले होते. रुग्णालयात त्या सुरक्षा रक्षकांना दिलेल्या गाद्या, उशा आणि त्याची कव्हर परत करण्याऐवजी ते सुरक्षा रक्षक आपल्यासोबतच घेऊन गेले. यानंतर रिम्स रुग्णालय प्रशासानानं झारखंड पोलिसांकडे पत्र लिहून याबाबत तक्रार केली आहे. "लालू प्रसाद यादव जेव्हा केली बंगल्यात होते तेव्हा त्यांच्या सुरक्षेसाठी १० पोलीस सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले होते. त्यांना गाद्या, उशा देण्यात आल्या होत्या. परंतु त्या ते आता परत करत नाहीत. यामुळे रिम्स रुग्णालयाला ससम्यांचा सामना करावा लागत आहे," अशा आशयाचं पत्र रुग्णालय प्रशासनानं झारखंड पोलिसांना लिहिलं. त्यांच्या या पत्रानंतर रांचीच्या एसएसपींनी त्वरित कारवाई करत पोलीस कर्मचाऱ्यांना रुग्णालयाचं सामान परत करण्याचा आदेश दिला आहे. तसंच यासाठी त्यांना २४ तासांचा अल्टिमेटमही देण्यात आला आहे. लालू प्रसाद यादव यांची तब्येत बिघडल्यानंतर त्यांना जानेवारी महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात रिम्स रुग्णालयातून एम्समध्ये हलवण्यात आलं होतं. रांचीमध्ये सुरू असलेल्या उपचारादरम्यान त्यांना श्वास घेण्यास त्रास होत होता. त्यावेळी रिम्स रुग्णालयाचे अध्यक्ष डॉ. कामेश्वर प्रसाद यांनी लालू प्रसाद यादव यांना निमोनिया झाल्याची माहिती दिली होती. त्यानंतर त्यांचं वय पाहता पुढील उपचारासाठी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. 

टॅग्स :Lalu Prasad Yadavलालूप्रसाद यादवJharkhandझारखंडdelhiदिल्लीAIIMS hospitalएम्स रुग्णालय