शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

पोलिंग एजन्टसाठी पोलीस ‘व्हेरिफिशन’

By admin | Updated: February 15, 2017 20:49 IST

अमरावती

अमरावती : महापालिका, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत मतदान केंद्र व मतमोजणी निवडणूक प्रतिनिधी नेमले जातात. यावेळी पोलिंग एजन्ट नेमताना चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र (पोलीस व्हेरिफिकेशन) पोलिसांकडून घ्यावे लागेल. गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्यास पोलिंग एजन्ट नेमण्यास निवडणूक आयोगाने मज्जाव केला आहे.२१ फेब्रुवारी रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत मतदान होणार आहे. तर २३ फेब्रुवारी रोजी मतमोजणी केली जाणार आहे. त्यासाठी प्रत्येक उमेदवार त्यांच्या कार्यकर्त्यांची पोलिंग एजन्ट म्हणून नेमणूक करतात. मात्र, त्याकरिता यंदापासून चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र पोलिसांकडून घेणे बंधनकारक आहे. पोलिंग एजन्ट्सची नावे, छायाचित्र अनुक्रमे नमुना ७ आणि ९ अर्ज भरुन मतदान आणि मतमोजणीपूर्वी ठरलेल्या मुदतीत निवडणूक विभागाकडे सादर करावे लागणार आहे. मतदानासाठी नेमल्या जाणाऱ्या पोलिंग एजन्ट्सचे नाव संबंधित प्रभागातील मतदारयादीत असणे अनिवार्य राहिल. निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून पोलिंग एजन्ट्सला छायाचित्र असलेले ओळखपत्र दिले जाते. संबंधित पोलिंग एजन्ट मतदान केंद्रात उपस्थित राहतात. बोगस मतदान होऊ नये, यासाठी पोलिंग एजन्टची नेमणूक केली जाते. मात्र, राज्य निवडणूक आयोगाच्या नव्या नियमानुसार पोलिंग एजन्ट्सचे नेमणूक करताना पोलिसांचे चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र दाखले सक्तीचे केले आहे. गुन्ह दाखल आहेत अथवा नाही याची खातरजमा करण्याची विनंती पोलिसांकडून केली जाणार आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींना पोलिंग एजन्ट नमू नये, याची दक्षता पोलिसांना घ्यावी लागणार आहे. मात्र पोलीस व्हेरिफिकेशन दाखल्याबाबत अद्यापही सुस्पष्टता नाही. (प्रतिनिधी)साधारणपणे पोलिंग एजन्ट हे गुन्हेगारी पार्श्वभूमीचे असू नये, असे अपेक्षित आहे. पोलिसांचे चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र सक्तीचे केले नाही. मात्र, उमेदवारांनी गुन्हेगारीवृत्तीच्या पोलिंग एजन्ट्सची नावे पाठवू नयेत. त्याची पार्श्वभूमी ‘हिस्ट्रीशिटर’ नको.- मदन तांबेकरनिवडणूक अधिकारी, महापालिका.