पोलिसांनी सुसाइड नोट पूर्ण जाहीर करावी
By Admin | Updated: October 29, 2015 22:02 IST2015-10-29T22:02:32+5:302015-10-29T22:02:32+5:30
ठाणे : परमार यांच्याकडून ज्यांनी लाच अथवा ज्यांनी खंडणी मागितली असेल त्यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे. परंतु, इतर नगरसेवकांना या चौकशीच्या फेर्यात कशाला अडकवता, असा सवाल काँग्रेसचे गटनेते संजय घाडीगावकर यांनी केला आहे. ठाणे महापालिकेच्या कॉंग्रेसच्या कार्यालयात आयोजित केलेल्या पत्रकारपरिषदेत त्यांनी ही माहिती दिली. तसेच या संपूर्ण प्रकरणाची पारदर्शक चौकशी करण्यासाठी याचा तपास सीबीआयकडे वर्ग करावा, अशी मागणीही आपण मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे केली असल्याचे त्यांनी सांगितले.

पोलिसांनी सुसाइड नोट पूर्ण जाहीर करावी
ठ णे : परमार यांच्याकडून ज्यांनी लाच अथवा ज्यांनी खंडणी मागितली असेल त्यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे. परंतु, इतर नगरसेवकांना या चौकशीच्या फेर्यात कशाला अडकवता, असा सवाल काँग्रेसचे गटनेते संजय घाडीगावकर यांनी केला आहे. ठाणे महापालिकेच्या कॉंग्रेसच्या कार्यालयात आयोजित केलेल्या पत्रकारपरिषदेत त्यांनी ही माहिती दिली. तसेच या संपूर्ण प्रकरणाची पारदर्शक चौकशी करण्यासाठी याचा तपास सीबीआयकडे वर्ग करावा, अशी मागणीही आपण मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे केली असल्याचे त्यांनी सांगितले. पोलिसांनी जाहीर केलेल्या सुसाइड नोटवरही त्यांनी आक्षेप नोंदवून ती नोट संपूर्ण जाहीर करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे. पोलिसांनी स्थायी समिती आणि महासभेचे इतिवृत्तान्त तपासासाठी घेतले असताना पुन्हा अशा पद्धतीने इतर नगरसेवकांना नोटीस पाठवून चौकशीसाठी बोलविणे हे योग्य नसल्याचेही त्यांनी सांगितले. परमार यांची सुसाइड नोट आधी का लपविण्यात आली, त्यातील सगळी नावे पोलिसांनी का जाहीर केली नाहीत, त्यांची आत्महत्या झाली त्या वेळेस कोण साक्षीदार होते, शेवटचा कॉल ११.३० वाजता केल्यानंतर पुढील दोन तासांत त्यांना कोणाचे फोन आले, त्यांचा कॉल रेकॉर्ड चेक केला का? चार दिवस उशिराने गुन्हा का दाखल झाला?, सुसाइड नोटचा पूर्ण खुलासा पोलीस केव्हा करणार? ,राजकारणातील काही व्यक्ती त्यांच्या प्रकल्पात भागीदार होते का? सभागृहात लक्षवेधी सूचना मांडणारे नगरसेवक व ही लक्षवेधी सूचना सभागृहात चर्चेला घेणारे महापौर हेही दोषी आहेत का, शासनाने परमार यांच्याबाबत घेतलेली सुनावणी व दिलेले आदेश हे कायदेशीररीत्या बरोबर आहेत का?, कॉसमॉस ग्रुपमध्ये भागीदार असणारे तथा सदनिका, बंगले घेणारे प्रशासकीय अधिकारी, राजकीय नेते, लोकप्रतिनिधी यांची नोंदणी दस्तावेज कधी प्राप्त करणार आणि यादी जाहीर कधी करणार आदी ३२ प्रश्नांची उत्तरे त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे मागितली आहेत. तसेच सध्या सुरू असलेला तपास हा संशयास्पद असल्याने या संपूर्ण प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे. .................वाचली - नारायण जाधव