बेळगावात पोलिसांची दडपशाही; मराठी भाषकांना घेतले ताब्यात, विधिमंडळात उमटले पडसाद
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2024 06:40 IST2024-12-10T06:40:26+5:302024-12-10T06:40:37+5:30
मितीच्या सुमारे ७८ कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

बेळगावात पोलिसांची दडपशाही; मराठी भाषकांना घेतले ताब्यात, विधिमंडळात उमटले पडसाद
लोकमत न्यूज नेटवर्क
काेल्हापूर/मुंबई : कर्नाटक विधानसभा अधिवेशनाविरोधात महाराष्ट्र एकीकरण समितीने आयोजिलेल्या महामेळाव्याची धास्ती घेत प्रशासनाने लागू केलेला जमावबंदीचा आदेश धुडकावत बेळगावमधील मराठी भाषकांनी रस्त्यावर उतरत घोषणाबाजी करीत सोमवारी आंदोलन केले. त्यानंतर समितीच्या सुमारे ७८ कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
या घटनेचे पडसाद विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनात उमटले. उद्धवसेनेच्या आमदारांनी पायऱ्यांवर आंदोलन करीत जोरदार घोषणाबाजी केली. तर विधान परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निषेध नोंदवत महाराष्ट्र सरकार सीमावर्ती भागातील मराठी बांधवांच्या पाठीशी आहे, अशी ग्वाही दिली.