शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

बोगस डॉक्टरांवर कारवाई करताना पोलिसांचे असहकार्य पोलिस आयुक्तांकडे तक्रार: दोन वर्षांत १७ जणांना पकडले

By admin | Updated: March 6, 2015 23:07 IST

पुणे : महापालिकेच्या आरोग्य विभागाच्यावतीने बोगस डॉक्टरांविरूध्द कारवाई करण्यासाठी गेलेल्या वैद्यकीय अधिकार्‍यांना पोलिसांचे सहकार्य मिळत नसल्याने त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे याबाबत थेट पोलीस आयुक्तांकडे तक्रार करून दाद मागण्यात येणार आहे.

पुणे : महापालिकेच्या आरोग्य विभागाच्यावतीने बोगस डॉक्टरांविरूध्द कारवाई करण्यासाठी गेलेल्या वैद्यकीय अधिकार्‍यांना पोलिसांचे सहकार्य मिळत नसल्याने त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे याबाबत थेट पोलीस आयुक्तांकडे तक्रार करून दाद मागण्यात येणार आहे.
शहरातील झोपडपटट्या तसेच उपनगर परिसरामध्ये बोगस डॉक्टर मोठया संख्येने कार्यरत आहेत. कोणतीही पदवी नसताना त्यांच्याकडून उपचार केले जात असल्याने अनेक रूग्णांचे जीवाला धोका निर्माण होत आहे. यापार्श्वभुमीवर महापालिकेच्या आरोग्य विभागाच्यावतीने बोगस डॉक्टरांविरोधात धडक मोहीम हाती घेण्यात आली. दोन वर्षात १७ बोगस डॉक्टरांवर कारवाईचा बडगा उचलण्यात आला आहे.
मान्यताप्राप्त पदवी नसताना प्रॅक्टीस करणार्‍या डॉक्टरची माहिती मिळाल्यानंतर महापालिकेच्या बोगस डॉक्टर शोध समितीकडून त्याची तपासणी केली जाते. त्यामध्ये तथ्य आढळून आल्यास संबंधित पोलीस ठाण्यात त्याच्याविरूध्द गुन्हा दाखल केला जातो. त्या डॉक्टरांकडे तपासणीला जाण्यापूर्वी पोलिसांना याची पूर्वकल्पना देऊन आवश्यक ते प्रोटेक्शन मागितले जाते. मात्र अनेकदा पूर्वकल्पना देऊनही पोलिसांकडून मदत मिळत नाही. त्यामुळे वैद्यकीय अधिकार्‍यांना धोका पत्करून कारवाई करावी लागतली. याबाबत बोगस डॉक्टर शोध समितीचे अध्यक्ष आयुक्त कुणाल कुमार यांना माहिती देण्यात आली आहे. तसेच पोलीस आयुक्तांशीही पत्रव्यवहार करण्यात येणार असल्याची माहिती प्रभारी आरोग्य प्रमुख डॉ. एस. टी. परदेशी यांनी दिली.
दर तीन महिन्यांनी बोगस डॉक्टर शोध समितीची बैठक घेतली जाते, त्याचा अहवाल राज्य शासनाला पाठवावा लागतो. बोगस डॉक्टरांना अटकाव करण्यासाठी शहरातील सर्व डॉक्टरांची माहिती संकलित करून संकेतस्थळावर टाकली जाणार आहे.