बोगस डॉक्टरांवर कारवाई करताना पोलिसांचे असहकार्य पोलिस आयुक्तांकडे तक्रार: दोन वर्षांत १७ जणांना पकडले
By Admin | Updated: March 6, 2015 23:07 IST2015-03-06T23:07:17+5:302015-03-06T23:07:17+5:30
पुणे : महापालिकेच्या आरोग्य विभागाच्यावतीने बोगस डॉक्टरांविरूध्द कारवाई करण्यासाठी गेलेल्या वैद्यकीय अधिकार्यांना पोलिसांचे सहकार्य मिळत नसल्याने त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे याबाबत थेट पोलीस आयुक्तांकडे तक्रार करून दाद मागण्यात येणार आहे.

बोगस डॉक्टरांवर कारवाई करताना पोलिसांचे असहकार्य पोलिस आयुक्तांकडे तक्रार: दोन वर्षांत १७ जणांना पकडले
प णे : महापालिकेच्या आरोग्य विभागाच्यावतीने बोगस डॉक्टरांविरूध्द कारवाई करण्यासाठी गेलेल्या वैद्यकीय अधिकार्यांना पोलिसांचे सहकार्य मिळत नसल्याने त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे याबाबत थेट पोलीस आयुक्तांकडे तक्रार करून दाद मागण्यात येणार आहे. शहरातील झोपडपटट्या तसेच उपनगर परिसरामध्ये बोगस डॉक्टर मोठया संख्येने कार्यरत आहेत. कोणतीही पदवी नसताना त्यांच्याकडून उपचार केले जात असल्याने अनेक रूग्णांचे जीवाला धोका निर्माण होत आहे. यापार्श्वभुमीवर महापालिकेच्या आरोग्य विभागाच्यावतीने बोगस डॉक्टरांविरोधात धडक मोहीम हाती घेण्यात आली. दोन वर्षात १७ बोगस डॉक्टरांवर कारवाईचा बडगा उचलण्यात आला आहे. मान्यताप्राप्त पदवी नसताना प्रॅक्टीस करणार्या डॉक्टरची माहिती मिळाल्यानंतर महापालिकेच्या बोगस डॉक्टर शोध समितीकडून त्याची तपासणी केली जाते. त्यामध्ये तथ्य आढळून आल्यास संबंधित पोलीस ठाण्यात त्याच्याविरूध्द गुन्हा दाखल केला जातो. त्या डॉक्टरांकडे तपासणीला जाण्यापूर्वी पोलिसांना याची पूर्वकल्पना देऊन आवश्यक ते प्रोटेक्शन मागितले जाते. मात्र अनेकदा पूर्वकल्पना देऊनही पोलिसांकडून मदत मिळत नाही. त्यामुळे वैद्यकीय अधिकार्यांना धोका पत्करून कारवाई करावी लागतली. याबाबत बोगस डॉक्टर शोध समितीचे अध्यक्ष आयुक्त कुणाल कुमार यांना माहिती देण्यात आली आहे. तसेच पोलीस आयुक्तांशीही पत्रव्यवहार करण्यात येणार असल्याची माहिती प्रभारी आरोग्य प्रमुख डॉ. एस. टी. परदेशी यांनी दिली.दर तीन महिन्यांनी बोगस डॉक्टर शोध समितीची बैठक घेतली जाते, त्याचा अहवाल राज्य शासनाला पाठवावा लागतो. बोगस डॉक्टरांना अटकाव करण्यासाठी शहरातील सर्व डॉक्टरांची माहिती संकलित करून संकेतस्थळावर टाकली जाणार आहे.