पंचवटीतील अवैध धंद्यांबाबत पोलिसांचे छापे
By Admin | Updated: February 14, 2015 23:51 IST2015-02-14T23:51:33+5:302015-02-14T23:51:33+5:30
पंचवटीतील अवैध धंदे : ६० जुगार्यांवर कारवाई : ८८ हजारांची रोकड जप्त

पंचवटीतील अवैध धंद्यांबाबत पोलिसांचे छापे
प चवटीतील अवैध धंदे : ६० जुगार्यांवर कारवाई : ८८ हजारांची रोकड जप्तनाशिक : पंचवटी परिसरातील चालणार्या दोन ठिकाणच्या अवैध धंद्यांवर पोलीस उपायुक्तांनी शनिवारी सकाळी छापे टाकले़ यामध्ये इंद्रकुंडासमोरील सिद्धी टॉवर्स येथील तीन व दिंडोरी नाक्यावरील एका मटक्याच्या अड्ड्याचा समावेश आहे़ पोलिसांनी केलेल्या या कारवाईत अवैध धंदेचालकांसह ६० जुगार्यांवर जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये कारवाई करून सुमारे ८८ हजारांची रोकडही जप्त करण्यात आली़ पंचवटी पोलीस ठाण्यातील वरिष्ठ अधिकार्यांच्या कृपाशीर्वादानेच हे अवैध धंदे सुरू असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी होत्या़पोलीस उपायुक्त अविनाश बारगळ, सहायक पोलीस आयुक्त रवींद्र वाडेकर यांच्यासह सरकारवाडा, भद्रकाली, आडगाव येथील पोलीस अधिकारी व कर्मचार्यांनी इंद्रकुंडासमोरील सिद्धी टॉवरमध्ये शनिवारी छापा टाकला़ यामध्ये मटका, गुडगुडी व तीन पत्ती (चक्री) असे तीन अवैध धंदे पोलिसांना आढळून आले़ या ठिकाणी अवैध धंदेमालकांसह ४२ जुगार्यांना रंगेहाथ पकडण्यात आले़ तसेच त्यांच्याकडील ६५ हजारांची रोकडही पोलिसांनी जप्त केली़यानंतर पोलिसांनी आपला मोर्चा दिंडोरी नाक्यावरील जुगार अड्ड्याकडे वळविला़ याठिकाणी अड्डा चालविणार्यासह १८ जुगार्यांसह अटक करून त्यांच्याकडून २३ हजारांची रोकडही जप्त करण्यात आली़ सिद्धी टॉवर व दिंडोरी नाका मिळून ६० जुगारी व ८८ हजार रुपयांची रोकड पोलिसांनी जप्त केली आहे़ मात्र यावेळी इंद्रकुंडाच्या पलुस्कर हॉल, पेठ फाटा, आडगाव अशा बहुतांशी ठिकाणी पोलिसांनी का छापे मारले नाहीत हा प्रश्न अनुत्तरित असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे़ (प्रतिनिधी)