केरळच्या मुख्यमंत्र्यांविरुद्ध पोस्ट टाकणारा पोलीस निलंबित

By Admin | Updated: August 4, 2016 18:02 IST2016-08-04T18:02:22+5:302016-08-04T18:02:22+5:30

फेसबुक या सोशल नेटवर्किंग साइटवर केरळचे मुख्यमंत्री पिनारायी विजयन यांच्याविरोधात पोस्ट टाकल्याप्रकरणी येथील एका पोलीस अधिका-यांला निलंबित करण्यात आले आहे.

Police post suspended against Kerala Chief Minister | केरळच्या मुख्यमंत्र्यांविरुद्ध पोस्ट टाकणारा पोलीस निलंबित

केरळच्या मुख्यमंत्र्यांविरुद्ध पोस्ट टाकणारा पोलीस निलंबित

ऑनलाइन लोकमत
अलाप्पुझा, दि. ०४ - फेसबुक या सोशल नेटवर्किंग साइटवर केरळचे मुख्यमंत्री पिनारायी विजयन यांच्याविरोधात पोस्ट टाकल्याप्रकरणी येथील एका पोलीस अधिका-यांला निलंबित करण्यात आले आहे.
राजागोपाल अरुनिमा असे या पोलीस अधिका-याचे नाव असून तो सशस्त्र राखीव पोलीस कॅम्पमध्ये कार्यरत होता. डेप्युटी कमांडंट इवान रेथींनाम यांनी केलेल्या सविस्तर चौकशीच्या अहवालानुसार राजागोपाल अरुनिमा याला निलंबित करण्यात आल्याचे जिल्हा पोलीस प्रमुख ए. अकबर यांनी सांगितले.
राजागोपाल अरुनिमा याने १ ऑगस्टला फेसबुकवरुन मुख्यमंत्री पिनारायी विजयन यांच्यावर टिका करत कोझीकोडे जिल्हा कोर्टाच्या आवारात पोलिसांनी मिडीयाच्या व्यक्तींना मारहाण केली होती. यात मुख्यमंत्री पिनाराची विजयन यांचा हात असल्याचे म्हटले होते, असे इवान रेथींनाम यांनी सांगितले. तसेच, पोलीस कोणत्याही प्रकारची सरकार किंवा कोर्टाच्याविरोधात सोशल मिडीयामध्ये टीका करु शकत नाहीत, कारण हा एक शिस्तीचा भाग आहे, असेही इवान रेथींनाम यांनी सांगितले.

Web Title: Police post suspended against Kerala Chief Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.