वाहतूक पोलिसाच्या अंगावर जीप घालण्याचा प्रयत्न पुणे बसस्थानकासमोरील प्रकार: कोतवालीत गुन्हा दाखल

By Admin | Updated: April 15, 2015 00:03 IST2015-04-15T00:03:31+5:302015-04-15T00:03:31+5:30

अहमदनगर : अवैध प्रवासी वाहतूक करणार्‍या जीप चालकास दंडात्मक कारवाई केल्याचा राग आल्याने त्याने शहर वाहतूक शाखेचे हेड कॉन्स्टेबल सुमित गवळी यांच्या अंगावर जीप घालण्याचा प्रयत्न केला. ही घटना सोमवारी सकाळी घडली असून या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील आरोपी जीपचालक फरार झाला आहे.

A police jeep on the transport policeman | वाहतूक पोलिसाच्या अंगावर जीप घालण्याचा प्रयत्न पुणे बसस्थानकासमोरील प्रकार: कोतवालीत गुन्हा दाखल

वाहतूक पोलिसाच्या अंगावर जीप घालण्याचा प्रयत्न पुणे बसस्थानकासमोरील प्रकार: कोतवालीत गुन्हा दाखल

मदनगर : अवैध प्रवासी वाहतूक करणार्‍या जीप चालकास दंडात्मक कारवाई केल्याचा राग आल्याने त्याने शहर वाहतूक शाखेचे हेड कॉन्स्टेबल सुमित गवळी यांच्या अंगावर जीप घालण्याचा प्रयत्न केला. ही घटना सोमवारी सकाळी घडली असून या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील आरोपी जीपचालक फरार झाला आहे.
नगर-पुणे रोडवर शहर वाहतूक शाखेच्या कर्मचार्‍यांची वाहतूक नियंत्रणासाठी नियुक्ती करण्यात आलेली आहे. बसस्थानक चौक ते यश पॅलेस चौकापर्यंत ठराविक अंतराने शहर वाहतूक शाखेचे पोलीस उभे असतात. स्वस्तिक चौक येथे वाहतूक शाखेचे पोलीस हेड कॉन्स्टेबल सुमित गवळी वाहनांची तपासणी करीत होते. यावेळी टाटा जीप (क्रमांक एम.एच. १२ बी- २७५३) चौकात आली. या जीपमध्ये अवैध प्रवासी असल्याचे आढळून आले. त्यामुळे जीप चालकास थांबण्याचा इशारा केला. मात्र जीपचालकाने अरेरावी करीत दलित महासंघाचा कार्यकर्ता असल्याचे बजावले. तसेच दंड भरण्यास नकार दिला. यावेळी पोलिसांनी त्याला कारवाईचा इशारा दिल्याने त्याने गवळी यांच्या अंगावर जीप घालण्याचा प्रयत्न केला. यावेळी गवळी यांचे सहकारी व सभोवताली काही लोक उपस्थित होते. त्यांनी गवळी यांना बाजूला केल्याने त्यांचा जीव वाचला. या प्रकरणी खुनाचा प्रयत्न आणि सरकारी कामात अडथळा, शिवीगाळ, दमदाटी केल्याप्रकरणी जीप चालक दिलीप महादेव जगदाळे (रा. शाहूनगर, केडगाव) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: A police jeep on the transport policeman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.