शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

आत्महत्या करण्यापूर्वी भय्यू महाराजांनी पत्नीला दिलं होतं खास गिफ्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2018 12:10 IST

भय्यू महाराजांच्या आत्महत्येचा तपास सुरू

इंदूर : अध्यात्मिक गुरु भय्यू महाराजांच्या आत्महत्येचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. आर्थिक समस्यांना कंटाळून जीवन संपवत असल्याचं भय्यू महाराजांनी आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत लिहिलं होतं. या आत्महत्या प्रकरणाचा तपास करणारे पोलीस भय्यू महाराज आणि दुसऱ्या पत्नीशी त्यांचे असलेले संबंध यांचाही तपास करत आहेत. भय्यू महाराज यांनी 2017 मध्ये आयुषी शर्मा यांच्यासोबत विवाह केला होता. कायम पांढऱ्याशुभ्र रंगाचे कपडे परिधान करणाऱ्या भय्यू महाराजांना केशरी रंग अतिशय आवडायचा. ज्या दिवशी (12 जून) भय्यू महाराजांनी आत्महत्या केली, त्याच दिवशी त्यांनी केशरी रंगाची साडी आयुषी शर्मा यांना दिली होती. आयुषी तीच साडी नेसून पदवी घेण्यासाठी विद्यापीठात गेल्या होत्या. महाराष्ट्राच्या रहिवासी असणाऱ्या आयुषी मेडिकलचा अभ्यास करण्यासाठी इंदूरला गेल्या होत्या. त्यांची आणि भय्यू महाराजांची ओळख अण्णा हजारेंच्या आंदोलनादरम्यान झाली. आयुषी यांच्या वडिलांना पाच भाऊ आहेत. हे सर्व भय्यू महाराजांचे अनुयायी आहेत. शिक्षण पूर्ण केल्यावर आयुषी यांनी भय्यू महाराजांच्या आश्रमात सोशल मीडिया मॅनेजर म्हणून काम सुरू केलं.आयुषी दिवसातील पाच तास भय्यू महाराजांच्या आईसोबत घालवायच्या. हा त्यांच्या कामाचा भाग होता. हळूहळू आयुषी यांचा भय्यू महाराजांच्या बहिणीशी चांगला परिचय झाला. आयुषी त्यांना अक्का म्हणायची. यानंतर दोघांमध्ये नियमित संवाद सुरू झाला. अक्का यांनी भय्यू आयुषी यांना भय्यू महाराजांशी लग्न करण्याबद्दल विचारणा केली होती. आयुषी यांना या प्रश्नाच्या उत्तरासाठी काही वेळ मागितला. यानंतर त्यांनी लग्नाला होकार दिला आणि 2017 मध्ये आयुषी आणि भय्यू महाराज विवाहबंधनात अडकले. 

टॅग्स :Bhayyuji Maharajभय्यूजी महाराजSuicideआत्महत्या