पोलीस निरीक्षकाच्या आत्महत्येचा तपास जवळपास पूर्ण

By Admin | Updated: January 30, 2016 00:17 IST2016-01-30T00:17:36+5:302016-01-30T00:17:36+5:30

निलंबित अधिकारी : हस्ताक्षर तज्ज्ञांच्या अहवालाची प्रतीक्षा

The police inspector's suicide investigation is almost complete | पोलीस निरीक्षकाच्या आत्महत्येचा तपास जवळपास पूर्ण

पोलीस निरीक्षकाच्या आत्महत्येचा तपास जवळपास पूर्ण

लंबित अधिकारी : हस्ताक्षर तज्ज्ञांच्या अहवालाची प्रतीक्षा
नाशिक : जळगावच्या रामानंदनगर पोलीस ठाण्याचे निलंबित पोलीस निरीक्षक अशोक सादरे यांच्या आत्महत्या प्रकरणाचा ९० टक्के तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने (सीआयडी) पूर्ण केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे़ सादरे यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठी पुणे येथे हस्ताक्षर तज्ज्ञांकडे पाठविण्यात आली असून सीआयडी तपासणी अहवालाच्या प्रतीक्षेत असल्याचे समजते.
डिसेंबरपासून रिक्त सीआयडीच्या अधीक्षकपदी औरंगाबादचे सहायक पोलीस आयुक्त रमेश गोविंद गायकवाड यांची पदोन्नतीवर नियुक्ती झाली असून त्यांनी पदभारही स्वीकारला आहे़ नाशिकच्या राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे अधीक्षक प्रदीप देशपांडे यांची कोल्हापुरला अधीक्षकपदी बदली झाल्यापासून हे पद रिक्त होते़ त्यानंतर अधीक्षकपदी अनघा साहू यांची वर्णी लागली. मात्र, त्या हजर झाल्याच नाही. दरम्यान त्यांचीही इतरत्र बदली झाली. अधीक्षकच नसल्यामुळे सादरे आत्महत्या प्रकरण, इमू घोटाळा यासह सीआयडीकडे वर्ग करण्यात आलेले आर्थिक घोटाळ्यांचे तपास रखडले होते़
सीआयडीचे पोलीस अधीक्षक रमेश गायकवाड यांनी २५ जानेवारीला सीआयडीच्या मुख्य कार्यालयात जाऊन पदभार स्वीकारला, तर शुक्रवारी प्रत्यक्ष नाशिक कार्यालयात हजेरी लावून प्रकरणांचा आढावा घेतला़ निलंबित पोलीस निरीक्षक सादरे यांनी १६ ऑक्टोबरला पंचवटीतील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती़ या प्रकरणाच्या तपासाचीही गायकवाड यांनी माहिती घेतली. (प्रतिनिधी)
--------------
सादरे यांच्या पत्नी माधुरी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जळगावचे पोलीस अधीक्षक डॉ़ जालिंदर सुपेकर, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रभाकर रायते, वाळू ठेकेदार यांच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे़ सीआयडीच्या अधीक्षकपदाची जबाबदारी रमेश गायकवाड यांनी स्वीकारल्याने प्रकरणाच्या तपासाला गती मिळणार आहे़

Web Title: The police inspector's suicide investigation is almost complete

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.