शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

नितीन गडकरींना बॉम्बने उडवण्याची धमकी देणारा कुख्यात गुंड; पोलिसांनी केला धक्कादायक खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2023 15:37 IST

nitin gadkari news: अलीकडेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आल्याची माहिती समोर आली होती. 

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आल्याची माहिती समोर आली  होती. त्यांच्या नागपूरमधील जनसंपर्क कार्यालयात शनिवारी सकाळी धमकीचे तीन फोन आल्यामुळे एकच खळबळ उडाली होती. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे कार्यालय उडवून देण्याची धमकी देणाऱ्या दोषी कैद्याला कर्नाटक पोलीस न्यायालयात हजर करण्याची तयारी करत असून पुढील तपासासाठी त्याला ताब्यात घेण्याची योजना आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी जयेश उर्फ ​​शाकीर उर्फ ​​साहिरने सांगितले की, दक्षिण कन्नड जिल्ह्यात वयाच्या 19 व्या वर्षी आई आणि तिच्या मुलाची हत्या केल्याप्रकरणी त्याला दोषी ठरवण्यात आले होते. त्याने कोर्टातून पळून जाण्याचा प्रयत्न केला पण त्याला वकिलांनी आणि जनतेने पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.

दरम्यान, आरोपींने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कार्यालयात फोन करून 100 कोटी रुपयांची मागणी केली होती. पैसे न दिल्यास नितीन गडकरी यांच्यासह संपूर्ण कार्यालय उडवून देण्याची धमकी त्याने दिली. पोलिसांनी आरोपीचा शोध घेतला. कारागृहात जॅमर बसवण्यात आला असला तरी तो फक्त 2G जॅमर होता आणि 4G मोबाइल नेटवर्कमध्ये तो प्रभावी नव्हता, असे तपासात समोर आले. हे कैदी राजकारण्यांना धमक्या देणारे फोन करत असल्याचे तपासात समोर आले आहे.  

पोलिसांनी केला धक्कादायक खुलासा खरं तर या आरोपीने सौम्या आणि तिचा तीन वर्षांचा मुलगा जिष्णू यांची 2 ऑगस्ट 2008 रोजी पुत्तूरजवळील शिराडी येथे हत्या केली होती. न्यायालयाने त्याला दोषी ठरवून फाशीची शिक्षा सुनावली. पुत्तूर येथील स्थानिक न्यायालयाच्या इतिहासातील अशा प्रकारची ही दुसरी घटना होती. हत्या झालेली महिला त्याची नातेवाईक असून त्याने तिचे सोन्याचे दागिने लुटले होते. हत्या केल्यानंतर तो केरळला पळून गेला, मग त्याने नाव बदलून लग्न देखील केले. 2012 मध्ये पत्नीशी भांडण आणि नारळाच्या झाडावर चढून गोंधळ घातल्याप्रकरणी त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले होते. पोलिसांनी सांगितले की, सुनावणीदरम्यान त्याने उडी मारून कोर्टातून पळून जाण्याचा प्रयत्न केल्यानंतर त्याला वकील आणि जनतेने पकडले होते. पोलिसांनी त्याच्याकडून गडकरींना बॉम्बच्या धमकीसंदर्भात फोन नंबर असलेली एक डायरी जप्त केली आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"    

 

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसKarnatakकर्नाटक