म्हणे, देवी बळी मागत होती; अन् व्यापाऱ्याची केली हत्या, दोन महिलांसह तिघांच्या आवळल्या मुसक्या

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2024 05:15 AM2024-04-15T05:15:11+5:302024-04-15T05:15:36+5:30

नवरात्रीच्या काळात देवी एका मोठ्या माणसाच्या बळीची मागणी करत होती, त्यामुळे गुप्ता यांची हत्या करावी लागली, असे चौकशीत आरोपींनी सांगितले.

Police have arrested three persons, including two women, in connection with the murder of Mahesh Gupta, a famous businessman in Chandigarh, Punjab | म्हणे, देवी बळी मागत होती; अन् व्यापाऱ्याची केली हत्या, दोन महिलांसह तिघांच्या आवळल्या मुसक्या

म्हणे, देवी बळी मागत होती; अन् व्यापाऱ्याची केली हत्या, दोन महिलांसह तिघांच्या आवळल्या मुसक्या

बलवंत तक्षक, लोकमत न्यूज नेटवर्क, चंडीगड : अंबाला कॅन्टोन्मेंट येथील प्रसिद्ध व्यापारी महेश गुप्ता यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी दोन महिलांसह तिघांना अटक केली आहे. नवरात्रीच्या काळात देवी एका मोठ्या माणसाच्या बळीची मागणी करत होती, त्यामुळे गुप्ता यांची हत्या करावी लागली, असे चौकशीत आरोपींनी सांगितले.

अटक करण्यात आलेली प्रिया, तिचा भाऊ हेमंत आणि वहिनी दीप्ती यांनी सांगितले की, महेश गुप्ता हा त्यांचा ओळखीचा होता, त्यामुळे  देवीला बळी म्हणून त्याची केली. देवी एका पुरुषाच्या बळीची मागणी करत होती, असे त्यांनी सांगितले. हेमंतने महेश गुप्ता यांचा गळा दाबला आणि त्याची पत्नी दीप्तीने त्याचे दोन्ही हात धरले. यानंतर प्रियाने त्याच्या प्रायव्हेट पार्टवर वार करत त्याचा बळी दिला. 

मृतदेहाजवळ होते नववधूला लागणारे साहित्य...
- गुप्ता यांच्या शोधासाठी त्यांचे नातेवाईक घरी गेले असता त्यांच्या मृतदेहाजवळ हेमंत, दीप्ती आणि प्रिया बसलेले दिसले. त्याच्या गळ्यात स्कार्फ घट्ट होता. 
- आरोपींनी त्यांना पाहताच वादावादी सुरू केली आणि तिघेही घटनास्थळावरून पळून गेले. हत्येची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी पोहोचले असता तेथे नववधूला घालण्यासाठी लागणारे साहित्य, हवन साहित्य, लिंबू आणि मेंदी पडून असल्याचे आढळून आले.
- पोलिसांनी हा सर्व मुद्देमाल ताब्यात घेतला असून, तीन आरोपींना अटक केली आहे.

Web Title: Police have arrested three persons, including two women, in connection with the murder of Mahesh Gupta, a famous businessman in Chandigarh, Punjab

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.