शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

BSF जवानाची निर्घृण हत्या; मुलीचा अश्लील व्हिडीओ करणाऱ्यांचा केला होता विरोध 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2022 13:03 IST

गुजरातमध्ये बीएसएफ जवानाच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी 7 जणांना अटक केली आहे.

Gujarat BSF Soldier Lynching । नवी दिल्ली : गुजरातमध्ये बीएसएफ जवानाच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी 7 जणांना अटक केली आहे. खरं तर गुजरातमधील नडियाद जिल्ह्यात एका बीएसएफ जवानाने आपल्या मुलीचा अश्लील व्हिडीओ करणाऱ्यांचा विरोध केला असता ही घटना घडली. आरोपी मृत बीएसएफ जवानाच्या मुलीचा अश्लील व्हिडीओ करत होते. नडियादचे डीएसपी यांनी दिलेल्या माहितीनुसार, मेलजीभाई वाघेला आणि त्यांचा मुलगा काही नातेवाईकांसह आरोपी शैलेश जाधवच्या घरी गेले होते. यादरम्यान वाद झाला होता. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीच्या घरी पोहोचल्यावर दोन्ही गटामध्ये भांडण झाले असता आरोपीचे वडील, काका व इतर कुटुंबीयांनी मृत बीएसएफ जवान वाघेला यांच्यावर हल्ला केला, त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. 

BSF जवानाच्या हत्येप्रकरणी 7 जणांना अटकडीएसपी व्हीआर बाजपेयी यांनी बीएसएफ जवानाच्या हत्येप्रकरणी आरोपींना अटक करण्यात आले असल्याची माहिती दिली. डीएसपी यांनी सांगितले की, 24 डिसेंबर रोजी नडियादमध्ये मुलीची अश्लील व्हिडीओ काढण्याला विरोध केल्यामुळे मुलीचे वडील बीएसएफ जवानाची हत्या करण्यात आली होती. यादरम्यान पीडित जवानाचा मुलगाही जखमी झाला, त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. बीएसएफ जवान मेलजीभाई वाघेला यांची हत्या केल्याप्रकरणी सात आरोपींना अटक करण्यात आली. 

आरोपीने बनवला होता अश्लील व्हिडीओ एफआयआरनुसार, गुजरात नडियाद तहसीलच्या वानीपुरा गावातील शैलेश उर्फ ​​सुनील जाधव याने बीएसएफ जवान वाघेला यांच्या मुलीचा व्हिडीओ बनवला होता. काही दिवसांपूर्वी आरोपीने हा व्हिडीओ अपलोड केल्यानंतर तो सोशल मीडियावर व्हायरल झाला. यामुळे बीएसएफ जवान वाघेला कुटुंबीयांसह आरोपीच्या घरी पोहोचले होते. लक्षणीय बाब म्हणजे 24 डिसेंबर रोजी शैलेशच्या घरात भांडण झाले तेव्हा बीएसएफ जवानाची मुलगी घटनास्थळी उपस्थित नव्हती. वाघेला यांचा मुलगा नवदीप याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्याच्यावर अहमदाबादच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"    

 

टॅग्स :GujaratगुजरातCrime Newsगुन्हेगारीBSFसीमा सुरक्षा दलDeathमृत्यूPoliceपोलिस