शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

पोलिसांनी अतिरेकी हल्ल्याचा कट उधळला; अहमदाबाद विमानतळावर चार दहशतवाद्यांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2024 07:07 IST

पोलिस महासंचालक विकास सहाय यांनी दिलेल्या माहितीनुसार, चारही जण कोलंबोहून चेन्नईमार्गे अहमदाबादला आले होते. इस्लामिक स्टेटच्या आदेशानुसार, अतिरेकी कारवाई करण्यासाठी ते भारतात आले होते. त्यांच्याकडून जप्त केलेले मोबाईल व अन्य साहित्यातून त्याची पुष्टीही झाली.

अहमदाबाद : येथील सरदार वल्लभभाई पटेल विमानतळावरून इस्लामिक स्टेटच्या चार दहशतवाद्यांना गुजरात पोलिसांच्या एटीएसने सोमवारी अटक केली. अटक करण्यात आलेले चारही दहशतवादी श्रीलंकन नागरिक असून, ते इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेचे सदस्य असल्याचे पोलिसांनी सांगितले. यापूर्वी ऑगस्ट महिन्यात राजकोट येथून एटीएसने अल-कायदाशी संबंधित तीन दहशतवाद्यांना अटक केली होती. मोहम्मद नुसरत, मोहम्मद फारूख, मोहम्मद नफरान व मोहम्मद रासदीन अशी त्यांची नावे आहेत.

पोलिस महासंचालक विकास सहाय यांनी दिलेल्या माहितीनुसार, चारही जण कोलंबोहून चेन्नईमार्गे अहमदाबादला आले होते. इस्लामिक स्टेटच्या आदेशानुसार, अतिरेकी कारवाई करण्यासाठी ते भारतात आले होते. त्यांच्याकडून जप्त केलेले मोबाईल व अन्य साहित्यातून त्याची पुष्टीही झाली. 

देशात आत्मघाती हल्ल्याची होती तयारी - अटक केलेले चारही आरोपी काही दिवस पाकिस्तानमध्ये राहिले आहेत. तिथून ते श्रीलंकन कट्टरपथीय नेत्यांच्या संपर्कात होते. - सोशल मीडियाद्वारेही ते इस्लामिक स्टेटच्या विचारसरणीचा प्रचार-प्रसार करत होते. भारतात आत्मघाती हल्ला करण्याचीही त्यांची तयारी होती, अशी माहिती पोलिसांनी दिली.

टॅग्स :terroristदहशतवादीTerrorismदहशतवादTerror Attackदहशतवादी हल्लाGujaratगुजरातPoliceपोलिस