शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

गोहत्या प्रकरणात 2 अल्पवयीन मुलींसह 9 जणांना पोलीस कोठडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2017 10:44 IST

लखनऊः उत्तर प्रदेशमधल्या मुजफ्फरनगर जिल्ह्यात गोहत्या प्रकरणात पोलिसांनी चक्क दोन अल्पवयीन मुलींना पोलिसांनी जेलमध्ये पाठवलं आहे. पोलिसांनी गोहत्या प्रकरणात दोन अल्पवयीन मुलींसह एकूण 9 जणांना बेड्या ठोकल्या आहेत.

लखनऊः उत्तर प्रदेशमधल्या मुजफ्फरनगर जिल्ह्यात गोहत्या प्रकरणात पोलिसांनी चक्क दोन अल्पवयीन मुलींना पोलिसांनी जेलमध्ये पाठवलं आहे. पोलिसांनी गोहत्या प्रकरणात दोन अल्पवयीन मुलींसह एकूण 9 जणांना बेड्या ठोकल्या आहेत. दोन्ही मुलींना पोलिसांनी सज्ञान असल्याचं सांगत न्यायालयात हजर केलं होतं. न्यायालयानंही त्यांची पोलीस कोठडीत रवानगी केली आहे, असं वृत्त टाइम्स ऑफ इंडियानं दिलं आहे.भारतात गोहत्या करण्यास बंदी असतानाही उत्तर प्रदेशमध्ये ही घटना घडली आहे. चार आरोपींनी पलायन केलं असून, पोलीस त्यांचा कसून शोध घेत आहेत. पोलिसांनी बेड्या ठोकलेल्या सर्व आरोपींना न्यायालयानं पोलीस कोठडीत पाठवलं आहे. 12 वर्षं आणि 16 वर्षं वयाच्या या दोन्ही मुलींना बालसुधारगृहात पाठवणं आवश्यक होतं. परंतु तसं न करत पोलिसांनी न्यायालयाची दिशाभूल करत त्यांना पोलीस कोठडी दिली आहे. आधार कार्ड पाहिल्यानंतर मुली अल्पवयीन असल्याचं उघड झालं आहे.एका मुलीचा जन्म 2001 साली, तर दुसरीचा जन्म 2005 साली झाल्याचं आधार कार्डमुळे स्पष्ट झालं आहे. 29 डिसेंबर रोजी पोलिसांनी  मुजफ्फरपूरमधल्या दोन घरांवर छापेमारी केली होती. छाप्यादरम्यान पोलिसांना या दोन्ही घरात गोमांस आढळून आले. या प्रकरणात पोलिसांनी 5 महिलांसह एकूण 9 जणांना अटक केली होती. परंतु या अल्पवयीन मुलींचीही तुरुंगात रवानगी केल्यामुळे उत्तर प्रदेश पोलिसांवर टीकेची झोड उठली आहे. 

टॅग्स :PoliceपोलिसUttar Pradeshउत्तर प्रदेशCourtन्यायालय