वाडीवर्हे सोने लुटीतील प्रमुख संशयितास पोलीस कोठडी
By Admin | Updated: August 2, 2015 22:55 IST2015-08-02T22:55:08+5:302015-08-02T22:55:08+5:30
नाशिक : तीन महिन्यांपूर्वी वाडीवर्हे शिवारात बंदुकीचा धाक दाखवून ५८ किलो सोन्याची लूट करणारा प्रमुख संशयित झिशान ऊर्फ सद्दाम इश्तियाक खान (३०, रा. आझमगढ, उत्तर प्रदेश) यास ठाणे पोलिसांकडून ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेतले असून, न्यायालयाने त्यास १० दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

वाडीवर्हे सोने लुटीतील प्रमुख संशयितास पोलीस कोठडी
न शिक : तीन महिन्यांपूर्वी वाडीवर्हे शिवारात बंदुकीचा धाक दाखवून ५८ किलो सोन्याची लूट करणारा प्रमुख संशयित झिशान ऊर्फ सद्दाम इश्तियाक खान (३०, रा. आझमगढ, उत्तर प्रदेश) यास ठाणे पोलिसांकडून ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेतले असून, न्यायालयाने त्यास १० दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. मुंबई-आग्रा महामार्गावरील वाडीवर्हे शिवारात २५ एप्रिल २०१५ रोजी मध्यरात्रीच्या सुमारास झिशान व त्याच्या इतर चार साथीदारांनी मिळून सिक्वेल लॉजिस्टिक कंपनीच्या सिक्युरिटी व्हॅनला अडवून सुमारे १५ कोटी रु पये किमतीचे ५८ किलो सोने लुटून नेले होते. या गुन्ात झिशान हा पांढर्या रंगाची लोगान कार चालवत असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी त्याच्याकडून आतापर्यंत १० किलो सोने व इतर असा सुमारे ३ कोटी १९ लाख रु पयांचा मुद्देमालही जप्त केला आहे. ठाणे पोलिसांकडून नाशिक ग्रामीण पोलीस दलाच्या गुन्हे शाखेला झिशानचा ताबा मिळाल्यानंतर त्यास रविवारी (दि.२) न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यास मंगळवारपर्यंत (दि.११) पोलीस कोठडी सुनावली आहे. ग्रामीण पोलिसांपुढे आता झिशानचे इतर चार साथीदार व उर्वरित ४८ किलो सोन्याचा तपास करण्याचे आव्हान असणार आहे.(प्रतिनिधी)