आता रस्त्यांवर नमाज पठण अन् आरती करण्यास बंदी
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2019 20:47 IST2019-08-14T20:47:06+5:302019-08-14T20:47:15+5:30
रस्त्यांवर नमाज पठण करणं आणि आरती करण्यावर सरकारनं बंदी घातली आहे.

आता रस्त्यांवर नमाज पठण अन् आरती करण्यास बंदी
लखनऊः रस्त्यांवर नमाज पठण करणं आणि आरती करण्यावर सरकारनं बंदी घातली आहे. उत्तर प्रदेशमधल्या पोलीस प्रशासनानं रस्त्यांवर नमाज पठण करणं आणि आरती करण्यात मज्जाव केला आहे. पोलीस महासंचालक ओपी सिंह यांनी हे आदेश काढले आहेत. सार्वजनिक ठिकाणी अशा प्रकारचं कोणतंही कार्य करता येणार नाही. त्यामुळे सामान्य जनजीवन विस्कळीत होतं.
डीजीपी सिंह पत्रकारांशी बातचीत करताना म्हणाले, धार्मिक ठिकाणी जेव्हा नमाज पठण करणं किंवा आरती करण्याची व्यवस्था केली जाते, त्यासाठी कोणतीही व्यक्ती रस्त्यावर येता कामा नये. नमाज पठण करणं किंवा आरती करण्यासाठी रस्ते वाहतुकीचा खोळंबा होता कामा नये, असंही सिंह यांनी स्पष्ट केलं आहे. तसेच हे नियम उत्तर प्रदेशातल्या सर्वच जिल्ह्यांना लागू असल्याचं ते म्हणाले आहे.
एक बैठक बोलावून सौहार्दपूर्ण वातावरणात अशा प्रकारची कारवाई केली जाईल. मला वाटतं की आमचा हा प्रयोग यशस्वी होईल. दुसरीकडे राज्यातील अलिगड आणि मेरठ जिल्ह्यांतील पोलीस प्रशासन कडक पावलं उचलत रस्त्यांवर धार्मिक कार्यक्रम करण्यावर पूर्णतः बंदी घातली आहे.