शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

माझ्या वडिलांना सोडा म्हणत चिमुकलीने पोलिसांच्या गाडीवर आपटलं डोकं, Video व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2020 13:27 IST

Uttar Pradesh Video : पोलिसांनी वडिलांना ताब्यात घेतल्यावर चिमुकलीने त्यांना सोडवण्यासाठी पोलिसांच्या गाडीवर डोकं आपटल्याची घटना समोर आली आहे.

बुलंदशहर - फटक्यांमुळे होणारं प्रदूषण आणि कोरोनाच्या संकटात रुग्णांना त्यामुळे असणारा धोका लक्षात घेऊन अनेक राज्यात फटाक्यांवर बंदी घालण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र तरी देखील काही ठिकाणी फटाक्यांची विक्री होत आहे. बुलंदशहरच्या खुर्जामध्ये फटाक्यांची विक्री करणाऱ्या एक दुकानावर पोलिसांना छापा मारला. दुकान विक्रेत्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्याचवेळी तिथे उपस्थित असलेल्या विक्रेत्याच्या मुलीचा एक व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे. 

पोलिसांनी वडिलांना ताब्यात घेतल्यावर चिमुकलीने त्यांना सोडवण्यासाठी पोलिसांच्या गाडीवर डोकं आपटल्याची घटना समोर आली आहे. माझ्या वडिलांना सोडा असं म्हणत ती मदतीसाठी याचना करत होती. पोलिसांनी चिमुकलीला पाहिलं. मात्र त्यांनी आपली कारवाई सुरूच ठेवली. हे पाहून चिमुकलीने पोलिसांच्या गाडीवर जोरजोरात डोकं आपटून घेण्यास सुरुवात केली. पोलिसांनी या चिमुकलीला अडवण्याचा प्रयत्न केला मात्र तरीही ती थांबली नाही. 

फटाक्यांची विक्री करणारे दुकानदार आणि पोलिसांमध्ये झाला वाद

चिमुकलीचा गाडीवर डोकं आपटतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला असून अनेकांना त्यावर संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, खुर्जा कोतवाली नगर क्षेत्रातील एका गावामध्ये फटाक्यांची विक्री केली जात होती. पोलिसांना याबाबत माहिती मिळताच ते कारवाईसाठी गेले. मात्र त्याचवेळी फटाक्यांची विक्री करणारे दुकानदार आणि पोलिसांमध्ये वाद झाला. पोलिसांनी त्यामुळे त्यांना ताब्यात घेतलं. मात्र हा संपूर्ण प्रकार दुकानदाराच्या मुलीने पाहिला. 

ती रडत होती... जोरजोराने पोलिसांच्या गाडीवर डोकं आपटत होती

वडिलांना पोलीस अशाप्रकारे घेऊन जात असलेलं पाहिल्यावर तिने पोलिसांच्या गाडीवर डोकं आपटायला सुरुवात केली. पोलिसांनी तिला थांबवलं. मात्र ती मोठमोठ्याने रडत असलेली आणि माझ्या वडिलांना सोडा असं म्हणत असलेली व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. पोलिसांनी चिमुकलीच्या वडिलांसह अन्य काही दुकानदारांवर देखील कारवाई केली आहे. फटाक्यांची विक्री करत असल्याने त्यांना ताब्यात घेतलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशPoliceपोलिस