शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
3
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
4
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
5
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
6
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
7
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
8
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
9
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
10
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
11
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
12
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
13
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
14
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
15
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
16
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
17
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
18
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
19
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
20
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या

अतिरेक्यांच्या हल्ल्यात काश्मिरात पोलीस शहीद, अतिरेक्याला पोलिसांनी पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2017 12:19 AM

श्रीनगरच्या बाहेर झाकुरा भागात शुक्रवारी अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यात पोलीस उपनिरीक्षक शहीद, तर दुसरा जखमी झाला. अतिरेकी कारमधून जात असताना त्यांनी श्रीनगर-गंडेबराल रस्त्यावर झाकुरा क्रॉसिंगजवळ पोलिसांच्या तुकडीवर हल्ला केला.

श्रीनगर : श्रीनगरच्या बाहेर झाकुरा भागात शुक्रवारी अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यात पोलीस उपनिरीक्षक शहीद, तर दुसरा जखमी झाला. अतिरेकी कारमधून जात असताना त्यांनी श्रीनगर-गंडेबराल रस्त्यावर झाकुरा क्रॉसिंगजवळ पोलिसांच्या तुकडीवर हल्ला केला. यात इम्रान टाक हे पोलीस उपनिरीक्षक शहीद झाले, असे स्पेशल पोलीस अधिकाºयाने सांगितले. पोलिसांच्या तुकडीने ही कार अडवून एका अतिरेक्याला ताब्यात घेतले; पण दोघे पळून गेले.अवघ्या आठवडाभरापूर्वी लष्कर ए तय्यबा या दहशतवादी संघटनेत दाखल झालेला महाविद्यालयीन विद्यार्थी व फुटबॉलपटू माजीद अर्शीद याने सुरक्षा दलांपुढे शरणागती पत्करली, असे अधिकाºयांनी शुक्रवारी सांगितले. गुरुवारी रात्री अर्शीद दक्षिण काश्मीरमध्ये सुरक्षादलाच्या छावणीत शस्त्रे व दारूगोळ्यासह शरण आला. त्याला शरण येण्याचे आवाहन त्याच्या आई-वडिलांनी दूरदर्शनवर केले होते. अर्शीदचा जवळचा मित्र चकमकीत ठार झाल्यावर तो हिंसाचाराकडे ओढला गेला होता. (वृत्तसंस्था)जवान जखमी-पंूछ आणि जम्मू जिल्ह्यांत नियंत्रण रेषेवर पाकिस्तानी सैनिकांनी युद्धविरामाचे उल्लंघन करून केलेला तोफमारा व गोळीबारात लष्कराचा जवान जखमी झाला. भारतानेही या माºयाला तेवढ्याच जोरदारपणे उत्तर दिले. पाकिस्तानकडून युद्धविरामाचे शुक्रवारी झालेले हे सलग तिसरे उल्लंघन आहे. पाकिस्तानकडून सकाळी ७.४५ वाजता पूंछ सेक्टरमध्ये कोणतेही कारण नसताना छोट्या स्वयंचलित शस्त्रांतून बेछूट गोळीबार सुरू झाला.

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू काश्मिरTerror Attackदहशतवादी हल्लाterroristदहशतवादी