पाकिस्तानकडून होत असलेल्या हवाई हल्ल्यांमुळे सीमा भागात लष्कराच्या हालचाली वाढल्या होत्या. लष्कराच्या हालचालीसंदर्भात कोणतीही माहिती, फोटो अथवा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केल्यास कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले होते. एका तरुणाला सोशल मीडियावर लष्कराच्या हालचालीसंदर्भातील व्हिडीओ पोस्ट केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
भारत पाकिस्तान यांच्यात लष्करी संघर्ष वाढल्यानंतर पोलीस आणि सायबर सेलकडून सोशल मीडियावर पोस्ट केल्या जाणाऱ्या मजकूर, फोटो आणि व्हिडीओवर नजर ठेवली जात होती. केंद्र सरकारने लष्कराच्या हालचालीशी संबंधित कोणत्याही प्रकारचे फोटो वा व्हिडीओ शेअर करण्यावर बंदी घातली होती. याच प्रकरणात तरुणाला अटक करण्यात आली आहे.
अटक झालेला तरुण कोण?
राजस्थानाताली बाडमेर जिल्ह्यात एका तरुणाला अटक करण्यात आली आहे. जियाराम तुलसाराम मेघवाल (वय २२, रा.पुनिया, तालुका गिडाहाल) असे या तरुणाचे नाव आहे.
जियारामने भारतीय लष्कराच्या हालचालीसंदर्भातील संवेदनशील व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला होता. याची गंभीर दखल घेतल डीएटी आणि डीसीआरबीच्या पोलीस पथकांनी त्याच्या कारवाई केली. त्याच्या भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कायद्यातील कलम १७० नुसार अटकेची कारवाई करण्यात आली.