बुलडाण्यात शिळ्या अन्नातून विषबाधा; माय-लेकीचा मृत्यू तीन बहिणींची प्रकृती अत्यवस्थ
By Admin | Updated: June 2, 2014 23:54 IST2014-06-02T23:54:10+5:302014-06-02T23:54:10+5:30
मेहकर (जि. बुलडाणा): तालुक्यातील दादुलगव्हाण येथील एकाच कुटुंबातील ५ सदस्यांना शिळ्या अन्नातून विषबाधा झाली. त्यात माय-लेकीचा मृत्यू झाला. तिघींची प्रकृती अत्यवस्थ आहे.

बुलडाण्यात शिळ्या अन्नातून विषबाधा; माय-लेकीचा मृत्यू तीन बहिणींची प्रकृती अत्यवस्थ
म हकर (जि. बुलडाणा): तालुक्यातील दादुलगव्हाण येथील एकाच कुटुंबातील ५ सदस्यांना शिळ्या अन्नातून विषबाधा झाली. त्यात माय-लेकीचा मृत्यू झाला. तिघींची प्रकृती अत्यवस्थ आहे. गंभीर अवस्थेतील तिघींना औरंगाबादला हलविण्यात आले आहे. मेहकर तालुक्यातील दादुलगव्हाण येथील समाधान पनाड हे मजुरीचे काम करतात. ३१ मेच्या रात्री त्यांची पत्नी व ४ मुलींनी शिळे अन्न शिजवून खाल्ले. समाधान व त्यांचा दोन वर्षाचा मुलगा ज्ञानेश्वर यांनी हे अन्न खाल्ले नाही. अन्नातून विषबाधा झाल्याने लिलाबाई समाधान पनाड व त्यांच्या चार मुली पुजा, उषा, पारु व पायल यांना उलटी-संडासचा त्रास सुरू झाला. १ जूनला हे कुटुंब मेहकर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आले. मात्र तोपर्यंत पाचही जणांची प्रकृती गंभीर वाटत असल्याने त्यांना बुलडाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. उपचार सुरु असताना लिलाबाई (३५) व पारु (१०) यांचा मृत्यू झाला. पूजा (१६), उषा (१२) व पायल (७) यांना गंभीर अवस्थेत सोमवारी औरंगाबादला हलविण्यात आले आहे. (प्रतिनिधी)