शहरं
Join us  
Trending Stories
1
पंजाब किंग्सच्या विजयाने वाढली चेन्नई सुपर किंग्सची डोकेदुखी; Play off साठी ठोकली दावेदारी
2
"हिम्मत असेल, तर घोषणा करा..."! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधींना दिली 3 आव्हानं; बघा VIDEO
3
"पोलिसांनी त्याची हत्या केली..."! सलमान खान गोळीबार प्रकरणातील आरोपीच्या आत्महत्येला नवं वळण
4
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
5
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
6
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
7
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
8
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
9
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
10
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
11
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
12
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
13
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
14
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
15
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
16
T20 World Cup साठी टीम इंडियात निवड झाली अन् आयपीएलमध्ये घसरली कामगिरी
17
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
18
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
19
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
20
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम

Yaas चक्रीवादळ: पश्चिम बंगाल, ओडिशा, झारखंडला एक हजार कोटींची मदत; PMO ची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2021 6:58 PM

Yaas चक्रीवादळ: पंतप्रधान कार्यालयाकडून पश्चिम बंगाल, ओडिशा आणि झारखंड या राज्यांसाठी एक हजार कोटींच्या मदतीची घोषणा करण्यात आली आहे.

ठळक मुद्देश्चिम बंगाल, ओडिशा, झारखंडसाठी एक हजार कोटींची मदत पंतप्रधान कार्यालयाकडून सदर माहितीराज्यांचा दौरा करून पुढील मदत करणार

नवी दिल्ली: पश्चिम किनारपट्टीला तौक्ते वादळाने तडाखा दिल्यानंतर लगेचच पूर्व किनारपट्टीला यास या चक्रीवादळाने (Yass Cyclone) तडाखा दिला. ओडिसा, पश्चिम बंगालसह अन्य राज्यांतही यास चक्रीवादळामुळे मोठे नुकसान झाले. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या भागांचा हवाई दौरा केला. त्यानंतर आता पश्चिम बंगाल, ओडिशा आणि झारखंड या राज्यांसाठी एक हजार कोटींच्या मदतीची घोषणा करण्यात आली आहे. पंतप्रधान कार्यालयाकडून सदर माहिती देण्यात आली आहे. (pmo declares one thousand crore rupees aid to yaas cyclone damage)

पंतप्रधान कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, यास चक्रीवादळामुळे मोठे नुकसान झालेल्या पश्चिम बंगाल, ओडिशा आणि झारखंड राज्यांना १ हजार कोटी रुपयांची मदत दिली जाणार आहे. तसेच या चक्रीवादळात मृत्यू पावलेल्यांच्या वारसांना दोन लाख तसेच गंभीररित्या जखमी झालेल्यांना ५० हजार रुपयांची मदत असल्याचे पंतप्रधान कार्यालयाने जाहीर केले. 

 

राज्यांचा दौरा करून पुढील मदत करणार

पंतप्रधान कार्यालयाने म्हटले आहे की, नुकसानीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय पथक राज्यांमध्ये जाऊन प्रत्यक्ष परिस्थिती पाहणार असून, यानंतर जो अहवाल केंद्राला सादर करण्यात येईल. त्यानुसार पुढील मदत केली जाईल. या संकटाच्या काळात ओडिशा, पश्चिम बंगाल आणि झारखंड या राज्यांना केंद्राचा पूर्ण पाठिंबा असल्याची ग्वाही पंतप्रधान मोदींनी यावेळी दिल्याचे कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे. तत्काळ उपाययोजना करण्यासाठी १ हजार कोटींची मदत दिली जात असून, ओडिशाला ५०० कोटी रुपये तातडीने दिले जाणार असून, उर्वरित ५०० कोटी रुपये पश्चिम बंगाल आणि झारखंडला चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीच्या आधारावर दिले जातील, अशी माहिती देण्यात आली आहे. 

ममता बॅनर्जींचा नाराजीचा सूर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतच्या बैठकीला भाजपचे विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी यांना निमंत्रित केल्याने मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी नाराजी व्यक्त करत हजेरी न लावण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, त्यानंतर त्यांनी बैठकीला उपस्थिती लावली आणि राज्यातील परिस्थितीचा आढावा सादर केल्याचे सांगितले जात आहे.  

 

टॅग्स :cycloneचक्रीवादळwest bengalपश्चिम बंगालOdishaओदिशाJharkhandझारखंडprime ministerपंतप्रधानNarendra Modiनरेंद्र मोदीMamata Banerjeeममता बॅनर्जीCentral Governmentकेंद्र सरकार