पीएमआय चार महिन्यातील नीचांकी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2020 05:33 AM2020-04-10T05:33:28+5:302020-04-10T05:33:47+5:30

भारतातील अन्य बाबीही अर्थव्यवस्थेच्या घसरणीची चिन्हे दर्शवित आहेत.

PMI four month low | पीएमआय चार महिन्यातील नीचांकी

पीएमआय चार महिन्यातील नीचांकी

Next

नवी दिल्ली : भारताच्या उत्पादन क्षेत्राची वाढ कमी झाली असून, मार्च महिन्यात परचेस मॅनेजर इंडेक्स (पीएमआय) घसरला आहे. या निर्देशांकात मार्च महिन्यात गेल्या चार महिन्यातील नीचांकी कामगिरी नोंदविली आहे. एका खासगी संस्थेद्वारे करण्यात आलेल्या सर्वेक्षणामध्ये भारताच्या उत्पादन क्षेत्राचा परचेस मॅनेजर इंडेक्स हा ५१.८ असा खाली घसरला आहे. फेब्रुवारी महिन्यात हा निर्देशांक ५४.५ असा होता. हा निर्देशांक ५० किंवा त्यापेक्षा अधिक असल्यास उत्पादन स्थिती चांगली असल्याचे मानले जाते.
देशातील कारोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी सरकारने लागू केलेल्या लॉकडाउनचा परिणाम देशातील उत्पादनावर झाला आहे. त्याचप्रमाणे जगभरातील अनेक देशांमध्ये लागू असलेल्या लॉकडाउनमुळे निर्यातीच्या आॅर्डर कमी होत आहेत. या सर्व बाबींचा परिणाम जून तिमाहीत वाढीचा दर कमी होण्यात दिसून येऊ शकतो, असे मत अर्थतज्ज्ञ इलिअट केअर यांनी व्यक्त केले आहे.
याशिवाय भारतातील अन्य बाबीही अर्थव्यवस्थेच्या घसरणीची चिन्हे दर्शवित आहेत.

सरकारचे प्रयत्न सुरू
च्कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी देशात लॉकडाउन सुरू आहे. अर्थव्यवस्थेवर त्याचा विपरीत परिणाम होऊ नये म्हणून सरकारने विविध उपाययोजना केल्या आहेत. यामध्ये रिझर्व्ह बँकेने दिलेल्या सवलती तसेच अर्थमंत्र्यांनी जाहीर केलेले पॅकेज यांचा समावेश आहे, मात्र याचा फारसा परिणाम होणार नसल्याचे मत पतमापन संस्थांनी नोंदविले आहे. आगामी वर्षातील भारतीय अर्थव्यवस्थेच्या वृद्धीदराचा अंदाज क्रीसिलने १.७० टक्क्यांनी कमी करून ३.५ टक्क्यांवर आणला आहे.


बाजारात तेजी; निफ्टी ९१०० पार
मुंबई : केंद्र सरकारकडून लवकरच आर्थिक पॅकेज मिळण्याच्या अपेक्षेने शेअर बाजारामध्ये तेजीचे वातावरण दिसून आले. गुरुवारी सेन्सेक्समध्ये १२६५ अंशांची वाढ झाली तर निफ्टीने ९१०० ची पातळी मागे टाकली. जगभरातील बाजारांमधील वातावरणही तेजीचे राहिले.
सरकारकडून लवकरच उद्योगांना दुसरे पॅकेज मिळण्याच्या अपेक्षेने खरेदी झाली. दिवसअखेर सेन्सेक्स १२६५.६६ अंशांनी वाढून ३१,१६९.६२ अंशांवर बंद झाला. नॅशनल स्टॉक एक्स्चेंजचा निर्देशांक निफ्टीने ९१०० अंशांचा टप्पा ओलांडला आहे. हा निर्देशांक ३६३.१५ अंशांनी वाढून ९१११.९० अंशांवर बंद झाला आहे.

Web Title: PMI four month low

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.